• Download App
    Tokyo Olympics : महिला हॉकी संघाचा पहिला विजय : आयर्लंडला 1-0 ने नमवलं ; तिरंदाजीत दिपीका कुमारीचे आव्हान संपुष्टात। Tokyo Olympics, Women's Hockey highlights: India defeats Ireland 1-0

    Tokyo Olympics : महिला हॉकी संघाचा पहिला विजय : आयर्लंडला १-० ने नमवलं ; तिरंदाजीत दिपीका कुमारीचे आव्हान संपुष्टात

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी भारतासाठी हॉकी, तिरंदाजी आणि बॅडमिंटनमधून चांगली बातमी मिळाली, तर बॉक्सिंगमध्ये भारताच्या वाट्याला निराशा आली. देशाची स्टार बॉक्सर मेरी कोमला राऊंड ऑफ 32 मध्ये पराभव पत्करावा लागला. पीव्ही सिंधू, अतानू दास आणि सतीश कुमार यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. Tokyo Olympics, Women’s Hockey highlights: India defeats Ireland 1-0

    30 जुलै म्हणजेच आजचा दिवस भारतीय खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारताचे काही खेळाडू पदकापासून एख पाऊल दूर असतील भारतीय महिलांनी आयर्लंड संघाविरुद्धचा सामना अखेर जिंकला आहे. भारतीय कर्णधार रानी रामपालच्या मदतीने नवनीत कौरने गोल करत सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटांत गोल करत सामना 1-0 ने जिंकला.



    टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला तिरंदाजीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारतीय खेळाडू आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या दिपीका कुमारीला दक्षिण कोरियाच्या अॅन सानकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. २० वर्षीय सानने संपूर्ण सामन्यावर आपलं वर्चस्व राखत ६-० च्या फरकाने बाजी मारत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

    रशियाच्या खेळाडूवर मात करुन उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेल्या दिपीका कुमारीमुळे भारतीयांना या खेळात पदकाची आशा होती. परंतू कोरियन खेळाडूने दिपीका कुमारीला संधीच दिली नाही. पहिल्या सेटमध्ये सात गुण घेत दिपीकाची सुरुवातच निराशाजनक झाली. यानंतरच्या दोन प्रयत्नांमध्ये दिपीकाने दोन १०-१० गुण मिळवत कमबॅक केलं. परंतू दुसरीकडे अॅन सानने तिन्ही संधींमध्ये १०-१० गुणांची कमाई करत पहिला सेट खिशात घातला.

    Tokyo Olympics, Women’s Hockey highlights: India defeats Ireland 1-0

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार