विशेष प्रतिनिधी
दिल्ली : BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनद्वारे वर्षांतील सर्वोत्तम बॅडमिंटन खिलाडी या पारितोषिकासाठी टोकियो आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविलेल्या प्रमोद भोगत यांना नॉमिनेशन मिळाले आहे. हे नॉमिनेशन मिळाल्यानंतर ANI सोबत बोलताना प्रमोद भगत याने आपला आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणतो, यावर्षी मला खेलरत्न पुरस्कार मिळत आहे. सक्षम आणि पॅरा अॅथलेटसना जेव्हा समान वागणूक मिळते तेव्हा बरे वाटते. आम्ही ऑलिम्पिक्समध्ये 19 पदके जिंकली आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी जिंकू आणि देशाचा मान उंचावत राहु.
Tokyo Olympics Gold Medalist Pramod Bhogtal Nominated For Best Badminton Player Award By Badminton World Federation
सप्टेंबरमध्ये टोकियो येथे झालेल्या विश्व चॅम्पियन स्पर्धेमध्ये त्यांना SL3 सिंगल्स या कॅटेगरीमध्ये सुवर्णपदक मिळाले होते. 33 वर्षीय भगत जेव्हा चार वर्षांचे होते, तेव्हा त्यांना पोलिओ झाला होता. तरीही आपल्या आजुबाजूच्या मुलांना खेळताना बघून त्यांनी सर्व गोष्टींवर मात करत आपला गेम बनवला. गेममध्ये पदार्पण केले. भगत सध्या जगातील सर्वोत्तम आणि SL3 या क्लासमध्ये खेळणारे अशियातील नंबर वन चॅम्पियन आहेत.
डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेन आणि एंडर्स एंटोनसेन, चीनच्या वनांग यी ल्यू, जपानच्या के यूटा वाटानाबे या सर्वांना सर्वश्रेष्ठ खेळाडू या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले आहे. यापैकी शटलर ऍक्सेलसेन याने टोकियो आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविले होते.
2019 मध्ये प्रमोद याला अर्जुन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड्स 2021 साठीदेखील त्याला नामांकन मिळाले होते.?
प्रमोद आपल्या यशाचे श्रेय आपले कुटुंब,मित्रमैत्रीण आणि अटी बीरा या गावातील लोकांना देतो.
Tokyo Olympics Gold Medalist Pramod Bhogtal Nominated For Best Badminton Player Award By Badminton World Federation
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!