वृत्तसंस्था
नवी दिल्ली – आसाम आणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे हेमंत विश्वशर्मा आणि योगी आदित्य नाथ या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावर मुस्लीम नेत्यांकडून टीका टिपण्या झाल्या आहेत. पण आतापर्यंत काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या नव्हत्या. tobe agitating about population is a wrong priority as not only population will stabilise at this level but also steadily start to decline
मात्र, आता शशी थरूर यांच्या मुखातून काँग्रेसचा लोकसंख्या नियंत्रण धोरणावरचा राग बाहेर आला आहे. लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर योगी सरकारवर शशी थरूर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, सध्या लोकसंख्या नियंत्रण धोरणाला प्राधान्य देणे चूक आहे. लोकसंख्येची वाढ विशिष्ट वेळेनंतर थांबणार आहे आणि नंतर ती कमी देखील होणार आहे. पण काही नेत्यांचे लोकसंख्या नियंत्रण धोरणाच्या निमित्ताने चर्चा घडवून समाजात फूट पाडण्याचे राजकारण सुरू आहे. मूळात तेच देशद्रोही आहे.
शशी थरूर यांनी जरी योगी आदित्यनाथ यांच्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावर टीका केली असली तरी लोकसभेतले काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी आसाममधल्या लोकसंख्या नियंत्रण धोरणाला आणि गोरक्षा धोरणाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या लोकसभेतल्या दोन वरिष्ठ सदस्यांनी केलेल्या वक्तव्यांमधली विसंगती आता समोर आली आहे.
tobe agitating about population is a wrong priority as not only population will stabilise at this level but also steadily start to decline