विशेष प्रतिनिधी
कोलकता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. त्यामध्ये असनसोल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. असनसोल विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी गेलेले तृणमूल काँग्रेसचे आमदार नरेन चक्रवर्ती यांनी पत्रकार परिषदेत मतदारांना खुली धमकी दिली आहे. असनसोल मध्ये पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर भाजपला मतदान कराल तर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आमदार नरेन चक्रवर्ती यांनी दिली आहे. TMC Violence Threat: Trinamool Congress MLA Naren Chakraborty threatens; If you vote for BJP, you will get results !!
तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या या धमकीनंतर सोशल मीडिया तीव्र प्रतिक्रिया उमटली असून अनेकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग करून हीच का तुमची कायदा आणि सुव्यवस्था?, हेच का तुमचे बंगाल प्रेम?, असे टोचणारे सवाल केले आहेत. नरेन चक्रवर्ती हे मतदारांना खुली धमकी देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, भाजपच्या मतदारांना मी सांगू इच्छितो त्यांनी बाहेरून मतदान करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील आणि त्या परिणामांची जबाबदारी त्या मतदारांचीच असेल, असे नरेन चक्रवर्ती बोलताना या व्हिडिओत दिसत आहेत.
– जिहादी दहशतवाद्यांचे थैमान
जिहादी दहशतवाद्यांनी बीरभूम जिल्ह्यात रामपुरहाट मध्ये नुकतीच 8 लोकांची घरे पेटवून देऊन हत्या केली होती. बंगाल मधील ममता बॅनर्जी सरकार कडून या प्रकरणाची चौकशी काढून घेऊन कोलकत्ता हायकोर्टाने ती सीबीआयकडे सोपवली आहे. राज्य सरकारने या चौकशीत लुडबूड करू नये. प्रत्यक्ष पुराव्यांची फेरफार करून खिलवाड करू नये, असे स्पष्ट आदेश हायकोर्टाने ममता बॅनर्जी यांच्या सरकारला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर असनसोल मतदारसंघातली पोटनिवडणूक होत असताना तृणमूल काँग्रेसचे आमदार येऊन खुली धमकी देतो याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.
TMC Violence Threat : Trinamool Congress MLA Naren Chakraborty threatens; If you vote for BJP, you will get results !!
महत्त्वाच्या बातम्या
- पालघरमध्ये ७ वर्षीय मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न, संतप्त जमावाची आरोपी मौलानाला बेदम मारहाण, कपडे फाडून धिंडही काढली
- बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरने ७०० अमेरिकन नागरिकांची केली फसवणूक आठ जणांना अटक
- Modi – Patole : पंतप्रधान मोदींच्या विरोधात नाना पटोलेंचा आक्षेपार्ह वक्तव्ये; कारवाईचे दिलीप वळसेंचे आश्वासन!!
- जेसीबी खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने 25 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित