• Download App
    'TMC'नेत्या महुआ मोइत्रा पैसे घेऊन संसदेत विचारतात प्रश्न - भाजपा खासदार निशिकांत दुबेंचा गंभीर आरोप! TMC leader Mahua Moitra takes money and asks questions in Parliament  BJP MP Nishikant Dubeys serious allegation

    ‘TMC’नेत्या महुआ मोइत्रा पैसे घेऊन संसदेत विचारतात प्रश्न – भाजपा खासदार निशिकांत दुबेंचा गंभीर आरोप!

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले पत्र

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केले आहेत. तसेच निशिकांत दुबे यांनी सुप्रीम कोर्टाचे वकील जय अनंत देहादराय यांच्या पत्राचा हवाला देत तपासाची मागणी केली आहे. TMC leader Mahua Moitra takes money and asks questions in Parliament  BJP MP Nishikant Dubeys serious allegation

    लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर सभागृहात प्रश्न विचारण्याच्या नावाखाली लाच घेतल्याचा आरोप केला आहे. हा सभागृहाचा अवमान असल्याचे दुबे यांनी लिहिले. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी,अशी मागणीही केली आहे.

    दुबे यांनी पत्रात म्हटले आहे की, “मला वकील जय अनंत देहादराय यांचे एक पत्र मिळाले आहे, ज्यात त्यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर प्रश्नांच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप केला आहे. दुबे यांनी पत्रात लिहिले आहे की, प्रसिद्ध व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांचे व्यावसायिक हित लक्षात घेऊन हे प्रश्न विचारण्यात आले आहेत. निशिकांत दुबे यांनी पत्रात लिहिले आहे की, महुआ मोइत्राच्या अलीकडील 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न असे आहेत जे दर्शन हिरानंदानी आणि त्यांच्या कंपनीच्या व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी किंवा फायद्यासाठी विचारले गेले आहेत.

    दुबे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, जेव्हा जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू असते तेव्हा मोहुआ मोईत्रा आणि सौगता रॉय कोणत्या ना कोणत्या कारणाने सर्वांशी गैरवर्तन करून सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणतात.दुबे यांनी लिहिले की, आता एका व्यावसायिकाकडून पैसे उकळण्याचा आणि लोकसभेत प्रश्न विचारण्याऐवजी दुसऱ्या व्यावसायिक गटाला लक्ष्य करण्याचा महुआ मोइत्राचा मनसुबा उघड झाला आहे.

    TMC leader Mahua Moitra takes money and asks questions in Parliament  BJP MP Nishikant Dubeys serious allegation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    President Droupadi Murmu : राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कार सोहळा; मुर्मू यांनी लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग यांना अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केले

    New Delhi EV Policy : दिल्लीत ईव्हीवर रोड टॅक्स-नोंदणी मोफत; ₹30 लाखांपर्यंतच्या गाड्यांवर सूट; 2028 पासून पेट्रोल-सीएनजी टू-व्हीलर्स बंद होतील

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी