लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले पत्र
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केले आहेत. तसेच निशिकांत दुबे यांनी सुप्रीम कोर्टाचे वकील जय अनंत देहादराय यांच्या पत्राचा हवाला देत तपासाची मागणी केली आहे. TMC leader Mahua Moitra takes money and asks questions in Parliament BJP MP Nishikant Dubeys serious allegation
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर सभागृहात प्रश्न विचारण्याच्या नावाखाली लाच घेतल्याचा आरोप केला आहे. हा सभागृहाचा अवमान असल्याचे दुबे यांनी लिहिले. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी,अशी मागणीही केली आहे.
दुबे यांनी पत्रात म्हटले आहे की, “मला वकील जय अनंत देहादराय यांचे एक पत्र मिळाले आहे, ज्यात त्यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर प्रश्नांच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप केला आहे. दुबे यांनी पत्रात लिहिले आहे की, प्रसिद्ध व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांचे व्यावसायिक हित लक्षात घेऊन हे प्रश्न विचारण्यात आले आहेत. निशिकांत दुबे यांनी पत्रात लिहिले आहे की, महुआ मोइत्राच्या अलीकडील 61 प्रश्नांपैकी 50 प्रश्न असे आहेत जे दर्शन हिरानंदानी आणि त्यांच्या कंपनीच्या व्यावसायिक हिताचे रक्षण करण्यासाठी किंवा फायद्यासाठी विचारले गेले आहेत.
दुबे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, जेव्हा जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू असते तेव्हा मोहुआ मोईत्रा आणि सौगता रॉय कोणत्या ना कोणत्या कारणाने सर्वांशी गैरवर्तन करून सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणतात.दुबे यांनी लिहिले की, आता एका व्यावसायिकाकडून पैसे उकळण्याचा आणि लोकसभेत प्रश्न विचारण्याऐवजी दुसऱ्या व्यावसायिक गटाला लक्ष्य करण्याचा महुआ मोइत्राचा मनसुबा उघड झाला आहे.
TMC leader Mahua Moitra takes money and asks questions in Parliament BJP MP Nishikant Dubeys serious allegation
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!