• Download App
    तिरुपती बालाजीला भाविकांनी वाहिलेल्या केसांची चीनमध्ये स्मगलींग, वायएसआर कॉँग्रेसवर केस माफिया असल्याचा माजी मंत्र्याचा आरोप | Tirupati Balaji's devotees hair smuggled in China, former minister accuses YSR Congress of being a hair mafia

    तिरुपती बालाजीला भाविकांनी वाहिलेल्या केसांची चीनमध्ये स्मगलींग, वायएसआर कॉँग्रेसवर केस माफिया असल्याचा माजी मंत्र्याचा आरोप

    आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी येथे देशभरातील लाखो भाविक भक्तीभावाने आपले केस अर्पण करतात. मात्र, हे केस स्मगलींगद्वारे चीनला पोहोचतात आणि तेथे त्यापासून विग बनविले जातात असा आरोप तेलगू देशम पक्षाच्या माजी मंत्र्याने केला आहे. सत्ताधारी वायएसआर कॉँग्रेस केसमाफियांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. Tirupati Balaji’s devotees hair smuggled in China, former minister accuses YSR Congress of being a hair mafia


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी येथे देशभरातील लाखो भाविक भक्तीभावाने आपले केस अर्पण करतात. मात्र, हे केस स्मगलींगद्वारे चीनला पोहोचतात आणि तेथे त्यापासून विग बनविले जातात असा आरोप तेलगू देशम पक्षाच्या माजी मंत्र्याने केला आहे. सत्ताधारी वायएसआर कॉँग्रेस केसमाफियांना संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

    मिझोरामच्या सीमेवर आसाम रायफल्सकडून केसांची तस्करी पकडली होती. सुमारे १२० पोती भरून दोन कोटी रुपयांचे हे केस होते. ते प्रथम म्यानमार तेथून थायलंड आणि शेवटी चीनला नेले जाणार होते. चीनमध्ये त्यांच्यापासून विग आदी वस्तू बनविल्या जातात, असे तेलगू देशम पक्षाच माजी मंत्री सी. एच. अय्यप्पा पत्रुडू यांनी म्हटले आहे.



    अयप्पा यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, वायएसआर कॉँग्रेसकडून वाळू, सिमेंट आणि दारू माफियांना संरक्षण दिले जातेच. आता केस माफियांनाही पोसले जात आहेत. भाविकांच्या भावनांशी खेळणाºया या प्रकाराविषयी मुख्यमंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा.

    अयप्पा म्हणाले, मिझोराममध्ये केवळ एका वेळी २ कोटी रुपयांचे केस पकडले. याचा अर्थ भाविकांनी वाहिलेले केसांचे वर्षभर काय होते हे लक्षात येईल.
    तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टने याबाबत केलेल्या खुलाशात म्हटले आहे की, येथील केस विकण्यासाठी पारदर्शक पध्दत आहे. केसविक्रीसाठी आंतरराष्ट्रीय
    पातळीवर बोली लावली जाते. सर्वाधिक बोली लावणाऱ्याला केस दिले जातात. त्याच्याकडून जीएसटीही घेतला जातो.

    Tirupati Balaji’s devotees hair smuggled in China, former minister accuses YSR Congress of being a hair mafia

    Related posts

    Chabahar Port : परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण- चाबहार बंदराबाबत भारताला एप्रिलपर्यंत सवलत, अमेरिकेसोबतही चर्चा सुरू

    Rafale Jets : भारत 114 राफेल जेट्स खरेदी करणार; मेक इन इंडिया अंतर्गत तयार होतील; संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी

    Sajad Lone : जम्मू-काश्मीरला दोन स्वतंत्र राज्ये बनवण्याची मागणी; सज्जाद लोन म्हणाले- सलोख्याने वेगळे होण्यावर विचार करण्याची वेळ