Tirupati Balaji : संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी; 11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही घेतले दर्शन
राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या राजकीय घडामोडींनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडिया आणि मतदारांच्या मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना ओमराजे यांनी सांगितले की, केवळ मतदारसंघाचा विकास आणि जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीच आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.