वृत्तसंस्था
हैदराबाद : बेंगळूरू – म्हैसूरु इंटरसिटी एक्सप्रेसचे टिपू सुपरफास्ट एक्सप्रेसचे नाव रेल्वे मंत्रालयाने बदलले आणि काँग्रेस – खासदार असदुद्दीन ओवैसी चिडले!!Tipu Superfast Express name dropped; Congress – Asaduddin Owaisi got angry!!
बेंगळूरु – म्हैसूरू इंटरसिटी एक्सप्रेसचे नाव आता वोडेयार एक्सप्रेस असे असणार आहे. मात्र या नामांतरामुळे काँग्रेस आणि हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी चिडले आहेत.
भाजप दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे, तर असदुद्दीन ओवैसी यांनी एक ट्विट करून भाजपला टोचले आहे. टिपू सुलतान हे नाव भाजपवाल्यांना आवडणार नाहीच कारण टिपू सुलतानने भाजपचे मालक असलेल्या इंग्रज सरकार विरुद्ध तीन वेळा युद्ध केले होते.
वास्तविक दुसऱ्या कुठल्याही गाडीचे नामकरण वोडेयार एक्सप्रेस करता आले असते. परंतु, भाजपने टिपू सुलतान हे नाव नाव काढून टाकून वोडेयार नाव दिले आहे. पण भाजपने हे लक्षात ठेवावे की टिपू सुलतानचा वारसा ते कधीही मिटवू शकणार नाहीत, असे ओवैसी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Tipu Superfast Express name dropped; Congress Asaduddin Owaisi got angry!!
महत्वाच्या बातम्या
- टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचे नामांतर आता वोडेयार एक्स्प्रेस!!; कर्नाटकात काॅंग्रेस नाराज
- सरसंघचालकांना प्रत्युत्तर देताना ओवैसी म्हणाले : मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाहीये, आम्ही सर्वात जास्त कंडोम वापरतो
- द फोकस एक्सप्लेनर : शिवसेनेसाठी लकी राहिले धनुष्यबाण; ढाल तलवार, रेल्वे इंजिन आणि खजुराच्या झाडावर झाला पराभव
- PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वी देणार विकासकामांची भेट