• Download App
    वारंवारं एकच प्रोडक्ट लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला कुलूप लावण्याची वेळ; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल |Time to lock up Congress shop with repeated launches of the same product; Prime Minister Modi's attack

    वारंवारं एकच प्रोडक्ट लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला कुलूप लावण्याची वेळ; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला प्रत्युत्तर देणे ही पंतप्रधान मोदींच्या भाषणाची वेगळीच खासियत आहे आज हीच खासियत पुन्हा एकदा प्रत्ययाला आली कारण त्यांनी काँग्रेसच्या बिघडलेल्या नाडीवर अचूक बोट ठेवत गांधी परिवारावर शरसंधान साधले वारंवार एकच प्रॉडक्ट लाँच करत राहिल्याने काँग्रेसच्या दुकानाला टाळे लावायची वेळ आली अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे वाभाडे काढले.Time to lock up Congress shop with repeated launches of the same product; Prime Minister Modi’s attack

    त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी लाल किल्ल्यांवरून भारतीय विषयी काढलेल्या अनुदार उद्गारांची चिरफाडही केली. नेहरू भारतीयांना आळशी आणि बुद्धीची कमतरतावाले लोक म्हणायचे, तर इंदिरा गांधी यांनी भारतीय आत्मविश्वास गमावलेले लोक आहेत, असा ठपका त्यांच्यावर ठेवला होता, याचा हवाला देणारी त्यांचीच भाषणे पंतप्रधान मोदींनी लोकसभेत वाचून दाखवली. त्यामुळे काँग्रेस खासदार भडकले आणि त्यांनी लोकसभेत हंगामा केला.



    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर आभार व्यक्त करताना विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. गेल्या 10 वर्षात काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी होती, पण त्यांनी चांगल्या नेत्यांना पुढे येण्याची संधी दिली नाही. विरोधी पक्षांमध्ये तरुण खासदार चमकले तर आपल्या घराण्यातल्या तरुणाचे काय होईल??, ही भीती काँग्रेस नेत्यांना वाटली. पण वारंवारं एकच प्रॉडक्ट लाँच केल्यामुळे काँग्रेसच्या दुकानाला कुलूप लावण्याची वेळ आली आहे. मोठा इतिहास असणाऱ्या काँग्रेस पक्षाला आम्ही नव्हे, त्यांचेच लोक दुकान म्हणत आहेत, असा टोमणाही पंतप्रधान मोदींनी हाणला.

     ओबीसींविषयी काँग्रेसचे मगरीचे अश्रू

    काँग्रेसचे नेते आज ओबीसींच्या प्रश्नावर नक्राश्रू ढाळतात, पण त्यांनी ओबीसी कल्याणची कधी खरी चिंता केली नाही करपुरी ठाकूर यांच्यासारख्या नेता विहारचा मुख्यमंत्री असताना त्यांना खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसचे नेते कारस्थाने करत होते. त्यांना दलित किंवा ओबीसी नेता कोणत्याही महत्त्वाच्या पदावर चालत नाही महत्त्वाच्या पदावर स्वतःच्याच घराण्यातले नेते बसले पाहिजेत हा त्यांचा आग्रह असतो. ज्यावेळी ते उघडपणे सत्तेच्या खुर्चीवर बसू शकत नाहीत, त्यावेळी ते नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल सारखी घटनाबाह्य समिती नेमतात आणि तिथे आपल्याच घराण्यातले लोक तिथल्या खुर्च्यांवर बसवतात, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी हाणला

    Time to lock up Congress shop with repeated launches of the same product; Prime Minister Modi’s attack

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट