Pulwama Encounter : शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही चकमक बराच वेळ सुरू होती. पुलवामाच्या काकापोरा भागात ही चकमकी घडली. three terrorists killed in Pulwama Encounter By Security forces today
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सैन्याने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही चकमक बराच वेळ सुरू होती. पुलवामाच्या काकापोरा भागात ही चकमकी घडली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे सर्व दहशतवादी स्थानिक होते आणि तीन मजली इमारतीत लपले होते. सुरक्षा दलाच्या स्फोटकांनी ही तीन मजली इमारत उडवण्यात आली. त्यानंतर तिन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. घटनास्थळावरून सुरक्षा दलाने शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. त्याचवेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
वास्तविक, दहशतवादी संघटना अमरनाथ यात्रेत अडथळे आणण्याच्या प्रयत्नात आहेत. यात्रेपूर्वी काश्मीरमधील हल्ले घडवून यात्रेची व्यवस्था बाधित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ले गेल्या काही दिवसांपासून तीव्र झाले आहेत. सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात आहे. दहशतवाद्यांच्या या कटामुळे सुरक्षा यंत्रणाही सावध झाल्या आहेत. काश्मीरमध्ये सैन्य, सीआरपीएफ आणि राज्य पोलिसांनी एकत्रितपणे दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे.
three terrorists killed in Pulwama Encounter By Security forces today
महत्त्वाच्या बातम्या
- सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल, 27 मार्च रोजी झाला होता कोरोनाचा संसर्ग
- सचिन वाझेंचे दाऊद कनेक्शन :अंबानी-स्कॉर्पिओ-अंडरवर्ल्ड-बनावट दहशतवाद असा रचला कट ; सर्वात मोठा धक्कादायक खुलासा ; ‘ हिरो’ बनण्यासाठी अंडरवर्ल्ड ‘व्हिलन’ची साथ?
- तैवानमध्ये भीषण रेल्वे अपघात, 36 जणांचा जागीच मृत्यू, 72 जण जखमी; मृतांची संख्या वाढण्याची भीती
- ब्रिटनमध्ये नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास, निर्बंध शिथील करण्यास सुरुवात
- कोरोनाचा फटका बसलेला जागतिक व्यापार चालू वर्षांत मात्र वाढण्याचा अंदाज