विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – जम्मू काश्मी रच्या अवंतीपोरा येथे सुरक्षा दलाने केलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. त्राल भागातील जंगलात झालेल्या चकमकीत जैशे महंमदचे तीन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून दोन एके ४७ रायफल्स, एक एसएलआर जप्त करण्यात आले.
एका दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव वकील शाह असे आहे. तो भाजपचा नेता राकेश पंडिता यांच्या हत्येत सहभागी होता. नागबरेन त्राल येथे दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार सुरक्षा दलाने आज कारवाई सुरू केली. दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन करण्यात आले. परंतु त्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यावेळी सुरक्षा दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि त्यात तीन दहशतवादी मारले गेले.
तालिबानसारखे दहशतवादी काश्मीतर खोऱ्यात घुसण्याचा प्रयत्न करत असतील तर पोलिस, लष्कर आणि अन्य सुरक्षा दल त्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केबी, छोटू आणि मनोज ४३ वर्षांनंतर पुन्हा आले एकत्र… कधी… कुठे…कसे…??
- “गोमूत्र शिंपडण्यापेक्षा रोजगार निर्माण करा”, नारायण राणे यांची शिवसेनेवर जोरदार टीका
- टोकियो पॅरालिम्पिक 2021: टोकियोमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी भारतीय खेळाडू हतबल, कोणी पाय गमावला तर कोणी अर्धांगवायूवर मात केली
- तालिबानने ७२ अफगाणी शीख आणि हिंदूंना विमानात चढण्यापासून रोखले : रिपोर्ट