वृत्तसंस्था
लखनौ : एक हजार गरीब हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या दोन मौलनांना अटक करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना पाकिस्तानच्या आएसआयने पैसे पुरविल्याचे उघड झाल्याने दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई केली. Thousand poor Hindus converted to Muslim ; Two Maulnana Attested In Utter pradesh
उत्तर प्रदेशात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मौलाना जहांगीर आणि उमर गौतम, अशी त्या मौलानांची नावे आहेत. ते लखनौ येथील एका मोठ्या संस्थेशी निगडित आहेत. त्यांनी प्रेरक विचारांच्या माध्यमातून एक हजार गरीब हिंदूंचे धर्मांतरण केले आहे. त्यामध्ये अनेक मूकबधिर आणि महिलांचा समावेश आहे.
रामपूर गावात दोन मुलांचा जबरदस्तीने खतना केल्याचे उघड झाले. तेव्हा त्यात धर्मांतर करणाऱ्या एका मौलानाचा हात असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही मौलाना पश्चिम युपीचे असून त्यांना परदेशातून रक्कम धर्मांतरासाठी दिली जात असल्याचे तपासात उघड झाले.
इस्लामिक सेंटरच्या नावाखाली उद्योग
दोन्ही मौलानांनी इस्लामिक सेंटरच्या नावाखाली हा उद्योग केला आहे. ३ जून रोजी दिल्लीतील डासना मंदिरात दोन मुस्लिम मुलांनी पुजाऱ्यावर हल्ला चढविला होता. त्यांना पकडल्यावर त्यांनी मौलाना जहांगीर आणि उमर यांची नावे सांगितल्यानंतर दोघांच्या कृत्याचा पर्दाफाश झाला.
कानपुर, बनारस आणि नोएडात धर्मांतर
नोएडा येथील एका मूक बधिर स्कूलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे दोघांनी आमिष दाखवून धर्मांतर केले आहे. त्यांच्याकडे धर्मांतर केलेल्या एक हजार महिला आणि मुलांची यादी सापडली आहे.
कानपुर, बनारस आणि नोएडा येथील अनेक मुले आणि महिलांचे त्यांनी धर्मातर घडवून आणले आहे. कानपुर येथील एका मुलाला ते घेऊन गेले होते. त्याचा शोध अद्यापि लागलेला नाही.
Thousand poor Hindus converted to Muslim ; Two Maulnana Attested In Utter pradesh
महत्त्वाच्या बातम्या
- नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या वादात राज ठाकरे उतरले; नाव छत्रपती शिवाजी महाराजांचेच असावे, म्हणाले…!!
- ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांना अटक
- काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडायला फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलेलं – हसन मुश्रीफ
- पुण्यामध्ये आज कोविशिल्ड लस उपलब्ध; १५७ केंद्रांवर सुविधा ; १०० डोस वितरित