• Download App
    काँग्रेसला लागली मोठी गळती, तरी बंद होण्याऐवजी चढ्या आवाजातच नेत्यांची बोलती!!|Though Congress leaders are leaving the party, remaining leaders adopt adamant approach

    काँग्रेसला लागली मोठी गळती, तरी बंद होण्याऐवजी चढ्या आवाजातच नेत्यांची बोलती!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राहुल गांधींच्या भारत जोडो न्यायात्रेदरम्यान काँग्रेसला लागली मोठी गळती, तरी बंद होण्याऐवजी चढ्या आवाजातच नेत्यांची बोलती!!, अशीच काँग्रेस मधल्या नेत्यांची वर्तणूक आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे समर्थक माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली.Though Congress leaders are leaving the party, remaining leaders adopt adamant approach



    पण या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांची बोलती बंद होण्याऐवजी ती चढ्या आवाजात व्हायला लागली. कोणी एक नेता पक्ष सोडून गेला म्हणून अख्खा पक्ष तिकडे गेला असे होत नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

    वास्तविक राहुल गांधींची भारत जोडून न्याय यात्रा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सारख्या बड्या राष्ट्रीय पक्षात भरती व्हायला हवी होती. वेगवेगळ्या पक्षांमधले इच्छुक नेते काँग्रेसमध्ये येऊन तिकिटाच्या रांगेत उभे राहायला हवे होते. पण प्रत्यक्षात राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा उलटाच परिणाम झाला. त्यांची यात्रा जसजशी पुढे सरकू लागली, तसतसे “इंडिया” आघाडीतले नेते तर आघाडी पासून बाजूला व्हायला लागलेच, पण खुद्द काँग्रेस मधूनही मोठी गळती सुरू झाली.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काँग्रेस पासून “सुरक्षित अंतर” राखायला सुरुवात केली, तर मुंबईत माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सोडली. त्यांच्या पाठोपाठ आज माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेस सोडली. या दोन्ही बड्या नेत्यांच्या पक्ष त्यागावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड सौम्य भाषा वापरली, पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र आक्रमकच भाषा वापरत एक दोन नेते पक्षाबाहेर गेले म्हणून अख्खा पक्ष गेला, असे होत नाही, असे वक्तव्य करून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पक्षांतर पक्षांत पक्षांतर्गत गळतीचा काही परिणाम होत नसल्याचे दाखवून दिले. अशी गळणारी काँग्रेस आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

    Though Congress leaders are leaving the party, remaining leaders adopt adamant approach

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pay Commission : 1 जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू होणार; कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी

    अर्बन नक्षलवाद्यांच्या हातात मराठीचे फलक; पण JNU मधल्या मराठी अध्यासनाला विरोध!!

    Vice President Election : द फोकस एक्सप्लेनर : उपराष्ट्रपती निवडणुकीची जोरदार तयारी; उमेदवारांची जोरदार चर्चा, कशी होते निवडणूक?