वृत्तसंस्था
लखनऊ : काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरानंतर काँग्रेसला लागलेली गळती, त्यानंतर राज्यसभा निवडणुकीमुळे आलेली अस्वस्थता या पार्श्वभूमीवर गांधी परिवारातील एक व्यक्ती प्रथमच उघडपणे बोलली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काँग्रेस सोडून जाणाऱ्यांवर प्रखर हल्ला चढवला आहे. जे निराश होते ते निघून गेले आणि लढणारे आपल्यात अजून काँग्रेसमध्येच आहेत, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी कपिल सिब्बल, हार्दिक पटेल, सुनील जाखड आदी नेत्यांवर हल्लाबोल केला. प्रियंका गांधी लखनऊ मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. Those who were disappointed are gone, the real fighters are in the Congress !!; Priyanka Gandhi’s attack
काँग्रेसचे चिंतन शिबिर उदयपूर मध्ये झाल्यानंतर काँग्रेस मधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली. यामध्ये सुनील जाखड, कपिल सिब्बल यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश तर आहेच, पण त्याचबरोबर हार्दिक पटेल, हरियाणातले तरुण नेते कुलदीप बिश्नोई यांचा देखील काँग्रेस सोडणार यामध्ये समावेश आहे. सुनील जाखड हे लोकसभेचे माजी सभापती बलराम जाखड यांचे पुत्र आहेत, तर कुलदीप बिश्नोई हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे नातू आहेत.
काँग्रेस नेत्यांच्या या गळतीवर गांधी परिवारातले गेल्या आठवडाभरात कोणी बोलले नव्हते. परंतु आज प्रियंका गांधी यांनी काँग्रेस सोडणाऱ्या नेत्यांवर प्रखर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. जनतेने देखील आपल्याला पाठिंबा दिला. परंतु, दुर्दैवाने काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे काही लोक जे मुळातच निराश होते ते निघून गेले. जे खरे लढवय्ये आहेत ते काँग्रेस मध्येच आहेत आणि भविष्यकाळात देखील लढून काँग्रेससाठी ते यश खेचून आणतील, असा विश्वास प्रियांका गांधी यांनी व्यक्त केला.
– गळती थांबेल की वाढेल?
प्रियांका गांधी यांच्या रूपाने प्रथमच गांधी परिवारातील व्यक्ती काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांवर बोलल्याने कार्यकर्त्यांना नेमकी दिशा मिळाली आहे. अर्थात प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस सोडून जाण्याची प्रक्रिया थांबेल ही आणखी वाढेल यावर मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Those who were disappointed are gone, the real fighters are in the Congress !!; Priyanka Gandhi’s attack
महत्वाच्या बातम्या
- तिकिटावरून काँग्रेसमध्ये बंडाळीची चिन्हे : सोनियांचा नाराज गुलाम नबी आझाद यांना फोन; आनंद शर्मा पक्ष सोडणार असल्याची चर्चा
- भूक भागेना : केंद्राकडून मेपर्यंतची 14145 कोटींची जीएसटी भरपाई; तरीही पवार म्हणाले, अजूनही 15000 कोटी बाकी!!
- मुंबईत दुकानांच्या पाट्या मराठीत नसल्यास 8 दिवसांत कायद्याचा बडगा!!; महापालिकेचे आदेश
- केंद्राकडून GST भरपाईची संपूर्ण रक्कम राज्यांना जारी ; महाराष्ट्राला मिळाले तब्बल 14,145 कोटी