• Download App
    Those who have done nothing against Pakistan are asking Modi government why didn't you go further??; Foreign Minister's attack in Lok Sabhaज्यांनी पाकिस्तान विरोधात काहीच केले नाही,

    ज्यांनी पाकिस्तान विरोधात काहीच केले नाही, ते मोदी सरकारला विचारताहेत तुम्ही आणखी पुढे का गेला नाहीत??; परराष्ट्र मंत्र्यांचा लोकसभेत हल्लाबोल

    Modi government

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पहलगाम मधला हल्ला आणि त्यानंतरचे ऑपरेशन सिंदूर या संदर्भात लोकसभेत झालेल्या चर्चेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या सगळ्या विरोधकांना सरकारला कोणत्या शैलीत प्रश्न विचारले पाहिजेत याचा स्पष्ट शब्दांमध्ये क्लास घेतला. त्या पाठोपाठ परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेस आणि युपीए प्रणित सरकारच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचे वाभाडे काढले.Those who have done nothing against Pakistan are asking Modi government why didn’t you go further??; Foreign Minister’s attack in Lok Sabha

    मुंबईतला 26 /11 चा हल्ला झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने पाकिस्तानवर क्रूज मिसाईलने हल्ला करायला हवा होता असा सल्ला तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी दिला होता, पण तो त्या वेळचे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी हाणून पाडला होता. याची आठवण राजनाथ सिंह यांनी करून दिली. यासाठी राजनाथ सिंह यांनी प्रणव मुखर्जी यांच्या पुस्तकाबरोबरच पाकिस्तानातले राजदूत अजय बिसारिसा यांच्या पुस्तकाचा देखील हवाला दिला‌.



    जयशंकर यांनी काढले वाभाडे

    राजनाथ सिंह यांच्या पाठोपाठ परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काँग्रेस सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे वाभाडे काढले. 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यानंतर आणि त्यानंतर झालेल्या लोकल मधल्या बॉम्बस्फोटानंतर भारताने गुळगुळीत भूमिका घेतली. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग शर्म अल शेख मध्ये पाकिस्तानी पंतप्रधानांना भेटले आणि दोन्ही देशांनी संयुक्त पत्र काढून दहशतवाद हा भारत आणि पाकिस्तान या दोघांसाठी हानिकारक असल्याचे म्हटले दहशतवादाचा पुरस्काराचा देश आणि दहशतवादाने पिडलेला देश एकत्र आल्याचे सगळे जगाने पाहिले. सगळ्यात दुर्दैवाचा भाग असा की पाकिस्तानच्या आग्रहापोटी संयुक्त पत्रकात बलुचिस्तान मधल्या घटनांचा ही दहशतवादी घटना म्हणून उल्लेख करण्यात आला, त्याची आठवण जयशंकर यांनी करून दिली.

    दहशतवादाविरुद्ध फक्त बोलायचे, पण कुठलीही कारवाई करायची नाही, अशा गुळगुळीत धोरणाने सरकार चालवणारे लोक आज विरोधी बाकांवर बसलेत, तेव्हा मोदी सरकारला प्रश्न विचारतात की तुम्ही पाकिस्तानला आणखी मोठा धडा का शिकवला नाही??, असा टोला जयशंकर यांनी हाणला.

     मोदी सरकारचे आक्रमक धोरण

    त्या उलट मोदी सरकारने पाकिस्तान विरोधात आक्रमक धोरण ठेवले. म्हणूनच ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठोकले. आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्र संघापासून ब्रिक्स आणि क्वाड देशांच्या समूहांकडून पाठिंबा मिळवला. पाकिस्तान हा दहशतवादाचा निर्माता देश आहे तर भारत दहशतवाद पीडित देश आहे हे स्पष्टपणे जगाला बजावले आणि जगाकडून मान्य करून घेतले, असे जयशंकर म्हणाले.

    Those who have done nothing against Pakistan are asking Modi government why didn’t you go further??; Foreign Minister’s attack in Lok Sabha

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Jaishankar : कान उघडे ठेवून ऐका, मोदी – ट्रम्प यांच्या दरम्यान एकही फोन कॉल नाही, एस. जयशंकर यांनी विरोधकांना सुनावले

    डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताची कुरापत; 25% टेरिफ सह लादला दंड; रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदीचे दाखविले कारण!!

    “पप्पू” नंतर राहुल गांधींची आज झाली “बढती”; राज्यसभेतून मिळाली “चायना गुरु”ची पदवी!!