वृत्तसंस्था
भोपाळ : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून धीर देण्याचं काम मध्य प्रदेश सरकारने केलं आहे. त्या अंतर्गत एक लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली. Those who died due to corona. His Family will get 1 lakh Rupees Assistance : Shivraj Singh chouhan
अनेक राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक त्रस्त असून रुग्णालयातील धावपळ आणि उपचारासाठीचा मनस्ताप हा चर्चेचा विषय बनला आहे. अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी होत आहे. तरीही रुग्ण दगावत आहेत. आता, मध्य प्रदेश सरकारने पीडित कुटुंबाला मदत देण्याचं जाहीर केली आहे.
दुसऱ्या लाटेत ज्याचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
भाजपाच्या आमदारांसोबत बैठकीत ते म्हणाले की, कोरोनाचं संकट कोसळलं आहे, त्यांना केवळ शाब्दीक आधार देऊन चालणार नाही. कोरोनाबाधितांना वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्यात अपयश आले. त्यामुळे, या कुटुंबीयांस आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे.
मध्य प्रदेशात दरमहा 5 हजार पेन्शन
कोरोनामुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना दरमहा 5000 रुपये पेन्शन देण्यात येईल. या मुलांना मोफत शिक्षण आणि मोफत रेशनचीही व्यवस्था केली आहे.
प्रदेश के पीड़ित परिवारों के साथ प्रदेश सरकार और हम पूरी दृढ़ता से खड़े हैं। #COVID19 के कारण इस दूसरी लहर में जिस परिवार में किसी की मृत्यु हुई है, उस परिवार को एक लाख रुपये अनुग्रह राशि दी जायेगी।