• Download App
    ही 'नमो भारत' ट्रेन नव्या भारताचा नवा प्रवास आणि नवे संकल्प परिभाषित करते - पंतप्रधान नरेंद्र मोदी This Namo Bharat train defines a new journey and a new resolution for a new India  Prime Minister Narendra Modi

    ही ‘नमो भारत’ ट्रेन नव्या भारताचा नवा प्रवास आणि नवे संकल्प परिभाषित करते – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    देशातील पहिल्या रॅपिडएक्स ट्रेनला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

    विशेष प्रतिनिधी

    साहिबााबाद  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२० ऑक्टोबर) साहिबााबाद रॅपिडएक्स स्टेशनवर दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉर देशाला भेट दिला. साहिबााबाद ते दुहाई डेपो दरम्यान धावणाऱ्या पहिल्या रॅपिडएक्स ट्रेनलाही त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. अशा प्रकारे देशात पहिली प्रादेशिक जलद वाहतूक व्यवस्था सुरू झाली. येथे लोकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, मी तर माझे बालपण रेल्वे प्लॅटफॉर्मवर घालवले आहे. This Namo Bharat train defines a new journey and a new resolution for a new India  Prime Minister Narendra Modi

    मोदी म्हणाले की, नवरात्रीचा सण सुरू आहे. त्यात शुभ कार्याची परंपरा आहे. मी दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेशचे अभिनंदन करतो. हा RRTS कॉरिडॉर भारताच्या नवीन संकल्पाची पूर्तता करतो. राज्याच्या विकासामुळे भारताचा विकास शक्य झाला आहे.

    दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गुरुवारी आरआरटीएस गाड्या ‘नमो भारत’ म्हणून ओळखल्या जातील, अशी घोषणा केली होती. त्यावरून बराच वाद झाला आणि काँग्रेसनेही या नावावर प्रश्न उपस्थित केले.

     

    साहिबााबाद येथे जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशासाठी ऐतिहासिक क्षण आहे. आज भारतातील पहिली जलद रेल्वे सेवा – नमो भारत ट्रेन – सुरू झाली आहे. ती देशाला समर्पित केली आहे. मोदी म्हणाले की, नमो भारत ट्रेनमध्ये आधुनिकता आणि वेग दोन्ही आहे. ही नमो भारत ट्रेन नव्या भारताचा नवा प्रवास आणि नवे संकल्प ठरवत आहे.

    This Namo Bharat train defines a new journey and a new resolution for a new India  Prime Minister Narendra Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी