Friday, 2 May 2025
  • Download App
    ''...हे राजेंद्र गुढा आणि माझ्यामध्ये साम्य आहे'' एकनाथ शिंदेंचे विधान! This is the similarity between Rajendra Gudha and me statement of Eknath Shinde

    ”…हे राजेंद्र गुढा आणि माझ्यामध्ये साम्य आहे” एकनाथ शिंदेंचे विधान!

    राजस्थानमधील रुग्णांच्या सेवेकरता शिवसेनेच्या वतीने ५ रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत.
    विशेष प्रतिनिधी
    जयपूर : राजस्थानमध्ये राजेंद्र गुढा यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला आहे. विधानसभेत लाल डायरी दाखवून गुढा प्रसिद्धीच्या झोतात आले होते, मात्र या घटनेनंतर गेहलोत सरकारने त्यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्यात आले होते. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली आहे. This is the similarity between Rajendra Gudha and me statement of Eknath Shinde
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”राजेंद्र सिंह गुडा हे कायम सत्यासाठी लढत आले असून सत्तेसाठी कधीच लढले नाहीत, सत्यासाठी त्यांनी सत्तेला लाथ मारली. मी देखील माझ्या ४० आमदारांच्या साथीने वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी सत्तेवर लाथ मारून बाहेर पडलो हे आमच्यात साम्य असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी राजस्थान राज्यातील रुग्णांच्या सेवेकरता शिवसेनेच्या वतीने ५ रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या.”
    राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाल्यानंतर राजेंद्र गुढा 24 जुलै रोजी ‘लाल डायरी’ घेऊन विधानसभेत पोहोचले होते. या डायरीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावरील आरोपांची संपूर्ण यादी असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, त्या दिवशी त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी ती डायरी त्यांच्याकडून हिसकावून घेतल्याचे गुढा म्हणाले होते. मात्र त्यांच्याकडे डायरीचा आणखी एक भाग असल्याचेही त्यांनी सांगितले.

    त्यांच्या या विधानानंतर राजेंद्र गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली. 21 जुलै रोजी विधानसभेत मणिपूरमधील घटनेवर काँग्रेस भाजपाला प्रश्न करत होती. त्याचवेळी महिलांच्या सुरक्षेत आपण अपयशी ठरलो हे खरे असल्याचे राजेंद्र गुढा म्हणाले होते. राजस्थानमध्ये ज्याप्रकारे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, त्याकडे मणिपूरऐवजी आपल्या राज्यातील परिस्थिती पाहिली पाहिजे.

    This is the similarity between Rajendra Gudha and me statement of Eknath Shinde

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam attack : पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर “गायब”; पण ISI च्या प्रेस रिलीज मध्ये दाखवला रणगाड्यावर उभा!!

    ADR Report : एडीआर रिपोर्ट : 143 महिला खासदार आणि आमदारांविरुद्ध गुन्हेगारी खटले; 78 जणांवर गंभीर आरोप

    Indian government : भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना दिला मोठा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय!