राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडल्याच्या पार्श्वभूमीवर दिली प्रतिक्रिया This is an injustice to the voters of Wayanad Enni Raja criticized Rahul Gandhi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याची घोषणा केल्यानंतर सीपीआय(एम) नेत्या एन्नी राजा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. वायनाडच्या मतदारांवर हा अन्याय असल्याचे एन्नी राजा यांनी सांगितले. तसेच त्या म्हणाल्या, राहुल गांधी यांनी हा निर्णय एका दिवसात घेतलेला नाही.
वायनाडची जागा सोडण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयावर त्यांनी पलटवार केला आणि म्हटले की जेव्हा एखादा नेता दोन जागांवरून निवडणूक लढवतो, तेव्हा त्याने (राहुल गांधी) एका दिवसात विचार करून हा निर्णय घेतला नसतो, त्याने आधीच विचार केला असेल. हे ते वायनाडच्या मतदारांना सांगू शकले असते.
काँग्रेसची सुमार कामगिरी असतानाही वायनाडच्या मतदारांनी राहुल गांधींना विक्रमी मतांनी खासदार म्हणून निवडून दिले होते, यावरही एन्नी राजा यांनी भर दिला. हा निर्णय त्यांनी आधी इथल्या मतदारांना सांगायला हवा होता आणि आता निवडणुकीनंतर तो अचानक जाहीर करत आहे. हा त्या मतदारांवर अन्याय आहे. हे मी तेव्हाही बोलले होतो आणि आजही तेच सांगते आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं.
त्यांनी पुढे सांगितले की मी वायनाडमध्ये दोन महिने निवडणूक प्रचार केला होता. तेव्हा लोकांनी मला सांगितले की राहुल गांधी यांना आम्ही विक्रमी मताधिक्यांनी विजय केलं, पण त्यांनी आमचे कोणतेही काम केले नाही. प्रत्येक पंचायतीमध्ये लोकांनी मला विचारले की तुम्हीही राहुल गांधींसारखे करणार का? हे मतदारांनी मला सांगितले आहे. या गोष्टी मी मनापासून सांगत नाही.
This is an injustice to the voters of Wayanad Enni Raja criticized Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार