वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नेहमी भाजपवर तोंडी फैरी झडत असताना प्रत्यक्षात काँग्रेस फोडतात. आज त्यांनी काँग्रेस फोडून कीर्ती आझाद यांना तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश दिला. या मुद्द्यावरून काँग्रेसचे लोकसभेचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ममता बॅनर्जी या काँग्रेस फोडताना दिसत असल्या तरी बाकीचे कोणीही काँग्रेसने ते त्यांच्या बाबत बोलताना दिसत नाहीत. एकटे अधीर रंजन चौधरी हेच त्यांच्या विरोधात लढा देताना दिसतात.These people thought they will not earn profit here. TMC has brought a lot of money by looting West Bengal and is doing political trade in Delhi
ममता बॅनर्जी आज दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्यांनी आपले पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी डेरा ठोकला आहे. तेथेच त्यांनी काँग्रेसचे नेते किर्ती आझाद यांची तृणमूल काँग्रेस मध्ये स्वागत केले. या मुद्द्यावर बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले, की ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल लुटला आहे. तोच पैसा घेऊन त्या दिल्लीत राजकीय सौदेबाजी करायला येतात. हे फक्त संधिसाधू राजकारण आहे. काँग्रेस सारखा धर्मनिरपेक्ष पक्ष फोडून त्यांना स्वतःच्या तृणमूल काँग्रेसचे राजकारण चालवायचे आहे. आम्ही त्यांचा कडाडून विरोध करतो, असे वक्तव्य अधीर रंजन चौधरी यांनी केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी आत्तापर्यंत अनेक काँग्रेस नेते फोडले आहेत. आसाम मधून सुश्मिता देव, गोव्यातून लुईजिनो फालेरो यांना फोडून त्या त्या प्रदेशाचे प्रमुख नेमले आहे. आता कदाचित कीर्ती आझाद यांच्याकडे दिल्लीतल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात येईल.
या पार्श्वभूमीवर अधीर रंजन चौधरी हे सोडून बाकीचे कोणतेही काँग्रेस नेते ममता बॅनर्जी यांच्या या राजकीय खेळी वर बोलताना दिसत नाहीत.
These people thought they will not earn profit here. TMC has brought a lot of money by looting West Bengal and is doing political trade in Delhi
महत्त्वाच्या बातम्या
- परमबीर सिंह प्रकरणात वकिलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार, म्हणाले- तपासात निष्काळजीपणाचा आरोपींना होऊ शकतो फायदा
- रशिया आणि युक्रेनमध्ये वाढता तणाव!
- Nanded Drugs : नांदेडमध्ये NCBची मोठी कारवाई, तब्बल 111 किलो ड्रग्ज जप्त
- WATCH : शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव राष्ट्रवादीच्या कार्यालयावर समर्थकांची दगडफेक