भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीचा गौरव करणार्या जाहीर रॅलीत ते बोलत होते.
विशेष प्रतिनिधी
वेल्लोर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि द्रमुकवर घराणेशाहीचे राजकारण आणि कथित भ्रष्टाचारावर निशाणा साधत त्यांना ‘टूजी, ३जी, फोरजी’ पक्ष म्हटले. तसेच, त्यांना समूळ उखडून टाकावे आणि येथील स्थानिक भूमीपुत्राला सत्ता द्यावी, अशी वेळ तामिळनाडूत आली आहे असे ते म्हणाले. These parties are 3G and 4G when it comes to corruption Amit Shah targets DMK and Congress
अमित शाह म्हणाले की, काँग्रेस आणि द्रमुक हे 2G, 3G, 4G पक्ष आहेत. मी 2G (स्पेक्ट्रम वाटप घोटाळा) बद्दल बोलत नाही. 2G म्हणजे दोन पिढ्या, 3G म्हणजे तीन पिढ्या आणि 4G म्हणजे चार पिढ्या.
शाह म्हणाले की मारन कुटुंब (द्रमुकचे) दोन पिढ्यांपासून भ्रष्टाचार करत आहे. करुणानिधी कुटुंब तीन पिढ्यांपासून भ्रष्टाचार करत आहे. गांधी कुटुंब 4G आहे. राहुल गांधी हे चौथी पिढी असून चार पिढ्या ते सत्तेचा उपभोग घेत आहेत.
भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीचा गौरव करणार्या जाहीर रॅलीत कलम 370 रद्द करण्याच्या आणि काश्मीरला भारताशी जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला विरोध केल्याबद्दल केंद्रातील दोन विरोधी पक्षांवर अमित शाह यांनी जोरदार टीका केली.
2G, 3G, 4G यांना तामिळनाडूच्या राजकारणातून बाहेर फेकून देऊन तामिळनाडूची सत्ता भूमीपुत्राकडे द्यायची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. अमित शाह यांनी जमावाला विचारले की कलम 370 हटवायला हवे होते की नाही? शाह म्हणाले की, काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यास डीएमके आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विरोध केला होता.
These parties are 3G and 4G when it comes to corruption Amit Shah targets DMK and Congress
महत्वाच्या बातम्या
- केंद्राच्या अध्यादेशाविरोधात ‘आप’ची मेगा रॅली, रामलीला मैदानावर 1 लाख लोक हजर राहणार असल्याचा दावा
- अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना तिहेरी तलाक, राम मंदिरावर प्रश्न विचारत साधला निशाणा, म्हणाले…
- मोदी सरकारने 9 वर्षात रचला विकसित भारताचा पाया; महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा नांदेडमधून अमित शाहांचा हुंकार
- द केरला स्टोरी नंतर दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा.