• Download App
    'हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ही निव्वळ फसवणूक आहे' समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचं संतापजनक आणि वादग्रस्त विधान! There is no religion called Hinduism it is pure fraud the angry and controversial statement of Samajwadi Party leader Swami Prasad Maury

    ‘हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, ही निव्वळ फसवणूक आहे’ समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांचं संतापजनक आणि वादग्रस्त विधान!

    स्वामी प्रसाद मौर्य यांच्या या बेताल वक्तव्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी हिंदू धर्माबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. जे  सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचवेळी या वक्तव्याबाबत लोक वेगवेगळ्या पद्धतीने संताप व्यक्त करताना दिसत आहेत. There is no religion called Hinduism it is pure fraud the angry and controversial statement of Samajwadi Party leader Swami Prasad Maury

    स्वामी प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे की, ‘ब्राह्मणवादाची मुळे खूप खोलवर आहेत आणि सर्व विषमतेचे कारणही ब्राह्मणवादच आहे. हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, हिंदू धर्म ही फसवणुक आहे. ब्राह्मण धर्माला हिंदू धर्म ठरवून दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांना आपल्या धर्माच्या जाळ्यात अडकवण्याचा कट आहे. हिंदू नावाचा खरोखरच एखादा धर्म असता तर आदिवासींना सन्मान मिळाला असता, दलितांचा सन्मान झाला असता, मागासलेल्यांनाही सन्मान मिळाला असता.

    स्वामी प्रसाद मौर्य यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही उमटत आहेत.  “हिंदू धर्मामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश होतो..दलित,आदिवासी किंवा मागासलेले..ते सर्व हिंदू समाजाचा अविभाज्य घटक आहेत..हिंदू हे एका सामूहिक शक्तीचे नाव आहे.” असे एकाने म्हटले आहे. याशिवाय ‘ब्राह्मणांना शिव्या देणे सोपे आहे कारण त्यातील बहुतांश सहिष्णू राहतात पण जेव्हा सहिष्णुतेचा बांध फुटतो तेव्हा इतिहास घडतो… विसरू नका. असा इशाराही दिला आहे.’ कुणी लिहिलंय की तुम्ही एवढा द्वेष का पसरवत आहात, कुणाची ‘लवकरच पुन्हा चपला खाव्या लागतील असं दिसतंय. अशाही काही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

    There is no religion called Hinduism it is pure fraud the angry and controversial statement of Samajwadi Party leader Swami Prasad Maury

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के

    Vishwa Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेने बंगाल सरकार बरखास्त करण्याची केली मागणी