जेपी नड्डा आणि अमित शाहा यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला निर्णय
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या खराब कामगिरीनंतर पक्ष राज्यातील संघटनेत मोठे फेरबदल होतील, असे मानले जात होते. मात्र, मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत झालेल्या महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर महाराष्ट्रातील भाजपच्या राजकीय नेतृत्वात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्र भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.There is no change in the leadership of Maharashtra BJP
बैठकीला कोण उपस्थित होते?
जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आणि आशिष शेलार, रावसाहेब दानवे या बैठकीला हजर होते. याशिवाय बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही केंद्रीयमंत्री पियूष गोयला यांचीही उपस्थिती होती. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, महाराष्ट्रात नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही.
महाराष्ट्र भाजप कोअर ग्रुपच्या केंद्रीय नेतृत्वासोबतच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी विचारमंथन झाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज महाराष्ट्राच्या कोअर टीमने केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक घेऊन निकालांवर सविस्तर चर्चा केली. कुठे मते मिळाली, कुठे नाही आणि कोणत्या सुधारणा कराव्यात यावर चर्चा झाली. विधानसभा निवडणूक कशी जिंकता येईल याबाबत एनडीएच्या मित्रपक्षांशी लवकरच चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
There is no change in the leadership of Maharashtra BJP
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांच्या राष्ट्रवादीची परफॉर्मन्स मध्ये वजाबाकी; पण नेत्यांची नाराजी आणि भाजपला दमदाटी!!
- स्वाती मालीवाल यांचे I.N.D.I.A आघाडीच्या बड्या नेत्यांना पत्र!
- मोदी 3.0 सरकारचा शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता बँकखात्यांमध्ये जमा; 9.60 कोटी शेतकऱ्यांना लाभ!!
- महायुतीत अजितदादा लाभार्थी, तरीही राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपलाच इशारा!!