वृत्तसंस्था
टोकियो : भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या क्वाड देशांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान मध्ये पोहोचले. त्यांच्या या दौर्यात कार्यक्रम भरगच्च आहेत. पण सध्या बोलबाला आहे, तो भारतीयांनी केलेल्या जोरदार स्वागताचा. ज्याने अयोध्येत राम मंदिर उभे केले, काशी विश्वनाथ कॉरिडोर घडवले त्या भारतीय सिंहाचे स्वागत असो, अशा घोषणा देत जपानमधील भारतीयांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले आहे. जपानी विद्यार्थ्याने हिंदी मध्ये संदेश देऊन आणि बोलून पंतप्रधानांचे स्वागत केल्याने त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. There are many events throughout the Quad’s tour, but Bolbala welcomes the Indian lion
- टोकियोत मोदींचे आगमन होताच भारतीय समुदायाने जय श्रीरामच्या घोषात त्यांचे स्वागत केले. ज्यांनी काशी सजवली ते टोकियोला आले आहेत.
- 40 तासांच्या जपान दौऱ्यात पंतप्रधान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बनीस यांची भेट घेणार आहेत. टोकियोमध्ये 40 तासांच्या वास्तव्यादरम्यान, पंतप्रधान जपानमधील 35 व्यावसायिक नेत्यांच्या आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू आहेत.
- पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन टोकियोमध्ये द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांसोबतच रशिया-युक्रेन मुद्द्यावरही चर्चा होणार आहे.
- भरगच्च कार्यक्रम
- एनईसी कॉर्पोरेशनच्या अध्यक्षांसोबत बैठक.UNIQLO च्या अध्यक्षांसोबत बैठक.
- सुझुकी मोटर्सच्या सल्लागारासोबत बैठक. सॉफ्टबँक ग्रुपच्या अध्यक्षांची भेट
- इंडो – पॅसिफिक आर्थिक पार्टनरशिप लॉन्च. जपानी व्यावसायिक नेत्यांसोबत गोलमेज बैठक
- जपानमधील भारतीय समुदायाशी संवाद
- QUAD शिखर परिषदेला उपस्थिती. भाषण. जपानच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या क्वाड लंचला उपस्थित राहतील.
- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेनसोबत बैठक. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत बैठक
- जपानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यासोबत बैठक. जपान-भारत असोसिएशनच्या अध्यक्षांसोबत बैठक. जपानच्या पंतप्रधानांसोबत डिनर.