• Download App
    जगातील सर्वात लांब ११.५ किमीचा रोपवे केदारनाथ यात्रेसाठी बांधणार The world's longest 11.5 km ropeway will be constructed for Kedarnath Yatra

    जगातील सर्वात लांब ११.५ किमीचा रोपवे केदारनाथ यात्रेसाठी बांधणार

     

    केदारनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना संपूर्ण दिवस लागायचा, तर आता केवळ एका तासात यात्रा पूर्ण करता येणार आहे.The world’s longest 11.5 km ropeway will be constructed for Kedarnath Yatra


    विशेष प्रतिनिधी

    डेहराडून : सध्या जगातील सर्वात लांब रोपवे मेक्सिको सिटीमध्ये आहे, ज्याला केबल बस २ म्हणून ओळखले जाते.त्याची लांबी १०.५५ किमी आहे.दरम्यान केदारनाथ धाम यात्रा भाविकांसाठी जगातील सर्वात लांब रोपवेचे स्वप्न साकार होणार आहे.यासाठी उत्तराखंड सरकारने जोरदार काम सुरू केले आहे. केदारनाथ धाममध्ये ११.५ किमी लांबीचा रोपवे बांधला जाणार आहे.

    केदारनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना संपूर्ण दिवस लागायचा, तर आता केवळ एका तासात यात्रा पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे भाविकांची यात्रा अधिक सहज होणार आहे.या रोपवेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ नोव्हेंबर रोजी केदारनाथ भेटीदरम्यान केदारनाथ आणि हेमकुंड साहिबमध्ये लवकरच रोपवेचे काम सुरू होईल, असे जाहीर केले होते. आता याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.


    केदारनाथ : ९ कारागीर अन् १८ मॉडेल, जाणून आदि शंकराचार्यांच्या १२ फुटी पुतळ्याच्या उभारणीमागचे रहस्य


    अवघ्या एका तासात प्रवास होणार पूर्ण

    समुद्रसपाटीपासून ११,५००फूट उंचीवर उत्तराखंडच्या चार धामांपैकी एक केदारनाथ आहे.दरम्यान केदारनाथ धाम यात्रेसाठी सध्या भक्तांना गौरीकुंड ते केदारनाथ धाम असा १६ किमीचा प्रवास करावा लागतो,त्यामुळे भक्तांचा संपूर्ण दिवस १६ किमीचा प्रवास करण्यात जातो. मात्र सोनप्रयाग ते केदारनाथ असा रोपवे बांधण्यात आल्याने आता हा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होणार आहे.

    The world’s longest 11.5 km ropeway will be constructed for Kedarnath Yatra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो