• Download App
    वेळ पडल्यास कठोर निर्बंध: लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा : आरोग्य राज्यमंत्री भारती पवार Strict restrictions if time permits: Lockdown decision of the state government: Minister of State for Health Bharti Pawar

    वेळ पडल्यास कठोर निर्बंध: लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा : आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

    विशेष प्रतिनिधी

    सांगली – वेळ पडल्यास कठोर निर्बंध लावणार असून लॉकडाऊनचा निर्णय राज्यसरकारचा असेल, असे केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी सांगितले. Strict restrictions if time permits: Lockdown decision of the state government: Minister of State for Health Bharti Pawar

    सध्या देशामध्ये ओमीक्रोनसह कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. बाधित रुग्णांची संख्या देखील चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उपाययोजना केल्या आहेत. देशातील सर्वच राज्यांना केंद्रांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या काळजी करण्याचे कारण नसले तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे अन्यथा वेळ पडल्यास कठोर निर्बंधांची अंमलबजावणी करावी लागेल, असा इशारा केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी दिला. त्या सांगलीमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.



    भारती पवार या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या. कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी त्या सांगली दौऱ्यावर आल्या होत्या. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे, पृथ्वीराज पवार, महिला मोर्चाच्या स्वाती शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. मंत्री भारती पवार यांचा यावेळी मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.

    Strict restrictions if time permits: Lockdown decision of the state government: Minister of State for Health Bharti Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुप्रीम कोर्टात याचिका- NOTA ला जास्त मते पडल्यास निवडणूक रद्द करावी; निवडणूक आयोगाला नोटीस

    काश्मीरच्या सोपोरमध्ये 2 दहशतवादी ठार, 2 जवान जखमी; 2 दिवसांपासून ऑपरेशन सुरू

    काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला नाही म्हणून नसीम खानांची नाराजी, पण ओवैसींच्या AIMIM ने केली त्यांची गोची!!