• Download App
    चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग होणार खुला, डोमिनिका करणार देशाबाहेर हकालपट्टी|The way to bring Choksi to India will be open, Dominica will be expelled from the country

    चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग होणार खुला, डोमिनिका करणार देशाबाहेर हकालपट्टी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला डोमिनिका सरकारने अवैध प्रवासी घोषित केले आहे. चोक्सीची देशाबाहेर हकालपट्टी करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचा आदेश डोमिनिकाचे राष्ट्रीय सुरक्षा आणि गृह विभागाचे मंत्री रेबर्न ब्लॅकमूर यांनी पोलिस प्रमुखांना दिला. The way to bring Choksi to India will be open, Dominica will be expelled from the country

    चोक्सीने अँटिग्वाहून डोमिनिकात समुद्रामार्गे अवैधरित्या प्रवेश केल्याचा आरोप असून त्यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याला भारताच्या ताब्यात देण्याचे आवाहन अँटिग्वा सरकारने केले होते,



    मात्र डोमिनिकातील एका न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणावर बंदी आणली. मात्र तेथील सरकारनेच चोक्सीला देशाबाहेर हाकलण्याचा आदेश दिला असल्याचे स्पष्ट झाल्याने भारतात परतण्याचा त्याचा मार्ग खुला झाला असल्याची चर्चा आहे.

    डोमिनिकाच्या गृह मंत्रालयाने चोक्सीलाही स्वतंत्र नोटीस त्याच दिवशी पाठविली होती. त्याला डोमिनिकात प्रवेश करण्यास परवानगी दिलेली नाही व त्याला स्वदेशात पाठविण्यासाठी आवश्यतक कार्यवाही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचेही नोटिशीत म्हटले आहे.

    The way to bring Choksi to India will be open, Dominica will be expelled from the country

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती