• Download App
    व्हायरस स्वत:हून येत नाही, कोणीतरी जाऊन आणतो, गर्दीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता|The virus does not come by itself, someone goes and brings it, the Prime Minister expressed concern about the crowd

    व्हायरस स्वत:हून येत नाही, कोणीतरी जाऊन आणतो, गर्दीबाबत पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : व्हायरस स्वत:च येत नाही, कोणीतरी जाऊन आणला तर तो येतो. हिल स्टेशन्स, बाजारपेठेत मास्क न लावता, प्रोटोकॉलचे पालन न करता प्रचंड गर्दी जमवणे ही चिंतेची बाब आहे. हे योग्य नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्दीबाबत चिंता व्यक्त केली आहे.The virus does not come by itself, someone goes and brings it, the Prime Minister expressed concern about the crowd

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना परिस्थितीबाबत ईशान्यकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पर्यटन क्षेत्रात वाढती गर्दी आणि ईशान्येकडील राज्यांमधील कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमाण याविषयी चिंता व्यक्त करत पंतप्रधान म्हणाले, आपल्या आरोग्य कर्मचाºयांनी गेल्या वर्षीपासून अधिक मेहनत घेतली आहे.



    आपल्याला सतर्क राहावे लागेल, लोकांना सतर्क करत रहावे लागेल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मायक्रो लेव्हलवर आपल्याला अधिक कठोर पावले उचलावी लागतील. कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंटवर आपल्याला लक्ष ठेवाले लागेल. कोरोना हा बहुरुपी आहे, त्याचे रुप वारंवार बदलते आणि आपल्यासाठी आव्हान निर्माण करते.

    आम्हाला प्रत्येक व्हेरिएंटवर बारीक नजर ठेवली लागेल. कोरोनामुळे पर्यटन, व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हिल स्टेशन्स, बाजारपेठेत मास्क न लावता, प्रोटोकॉलचे पालन न करता प्रचंड गर्दी जमवणे ही चिंतेची बाब आहे. हे योग्य नाही. कोरोनाची तिसरी लाट येण्यापासून थांबविणे हा एक मोठा विषय आहे.

    आपल्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यास कोणतीही तडजोड करण्याची गरज नाही. तज्ज्ञ वारंवार इशाराही देत आहेत की, दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि जास्त गदीर्मुळे कोरोना संक्रमणामध्ये मोठी वाढ होऊ शकते. प्रत्येक स्तरावर पावले उचलली पाहिजेत.

    ईशान्येकडील राज्यांनी मोठ्या प्रमाणात लसीचा अपव्यय रोखला आहे. चार राज्यांमध्ये जिथे काही कमतरता दिसून येते, तेथील कामकाजात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे,असे सांगून पंतप्रधान म्हणाले, ईशान्य राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे.

    तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करावी लागेल. लसीशी संबंधित गोंधळ दूर करण्यासाठी आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्व लोकांना जोडणे आवश्यक आहे

    The virus does not come by itself, someone goes and brings it, the Prime Minister expressed concern about the crowd

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य