• Download App
    आशियाई खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या मणिपूरच्या रोशिबिनाची कहाणी; आई-वडील हिंसाचारात अडकले, चीनमध्ये मुलीने जिंकले सिल्व्हर मेडलThe story of Roshibina from Manipur who excelled in the Asian Games; Parents caught in violence, daughter wins silver medal in China

    आशियाई खेळात चमकदार कामगिरी करणाऱ्या मणिपूरच्या रोशिबिनाची कहाणी; आई-वडील हिंसाचारात अडकले, चीनमध्ये मुलीने जिंकले सिल्व्हर मेडल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रोशिबिना देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत वुशूमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकले. गेले चार महिने रोशिबिनासाठी एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नव्हते. एकीकडे मणिपूर हिंसाचारात जळत होते, जिथे तिचे आई-वडील आणि भावंडे अडकली आहेत, तर दुसरीकडे ती श्रीनगरमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी करत होती.The story of Roshibina from Manipur who excelled in the Asian Games; Parents caught in violence, daughter wins silver medal in China

    ती तिच्या आई-वडिलांशी रोज बोलायची, पण एक आठवडाभर तिला दोघांशीही बोलता आले नाही. ती तयारीत व्यग्र असायची, पण तिचं मन मणिपूरमध्येच असायचं. रोशिबिनाचे कुटुंब मणिपूरमधील सर्वाधिक हिंसाचारग्रस्त भाग असलेल्या विष्णुपूर जिल्ह्यात राहते. जेव्हा ती तिच्या वडिलांशी हांगझोऊमधून बोलली तेव्हा त्यांनी रोशिबिनाला तिची चिंता बाजूला ठेवून देशासाठी पदक जिंकण्यास सांगितले. रोशीबिनाच्या वडिलांनी पोट भरण्यासाठी आपली जमीनही विकली. याच रोशिबिनाने गुरुवारी वुशूच्या 60 वजनी गटात रौप्यपदक पटकावले. तिला अंतिम फेरीत चीनच्या जिओ वेईकडून 0-2 ने पराभव पत्करावा लागला. रोशिबिनाने जकार्ता एशियाडमध्ये कांस्यपदक जिंकले होते.



    रात्री पहारा देतात आईवडील

    रोशिबिना सांगते की ती मैतेई आहे. गावाच्या रक्षणासाठी तिचे आई-वडील रात्री पहारा देण्याचे काम करतात. जूनमध्ये ती तिच्या वडिलांना शेवटची भेटली होती, पण ती अजूनही गावी जाऊ शकत नाही. पदक जिंकल्यानंतर तिने कुकी आणि मैतेई समुदायांमधील हिंसाचार थांबविण्याचे आवाहन केले.

    जमीन विकली पण मुलीला सांगितले नाही

    रोशिबिना सांगते की, अनेकदा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी तिच्याकडे विमानाचे तिकीट नव्हते. वडील नौरेम दामू सिंग यांना तिला खेळण्यापासून रोखायचे नव्हते. त्यांनी गुपचूप शेतजमिनीचा काही भाग विकला आणि तिची तिकिटे काढली, परंतु त्याबद्दल तिला सांगितले नाही. वडिलांनी तिच्यासाठी जमीन विकल्याचे तिच्या बहिणीने तिला सांगितले.

    The story of Roshibina from Manipur who excelled in the Asian Games; Parents caught in violence, daughter wins silver medal in China

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज