विशेष प्रतिनिधी
मुंबई : तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बंपर विजयाचा परिणाम दुसऱ्या दिवशीही शेअर बाजारात दिसून येत आहे. सोमवारनंतर मंगळवारीही शेअर बाजारात विक्रमी वाढ दिसून आली. 5 डिसेंबर रोजी बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला.The stock market bounced today Sensex crossed the 69000 level for the first time
BSE सेन्सेक्सने प्रथमच 69000 चा टप्पा पार केला. बाजार तेजीसह उघडला आणि प्रथमच बीएसई सेन्सेक्स 69,306 आणि निफ्टी 20,813 अंकांवर पोहोचला. सध्या निफ्टी 153.8 अंकांनी वाढल्यानंतर 20,840.60 वर ट्रेंड करत आहे. तर सेन्सेक्स 449.20 अंकांच्या वाढीनंतर 69,314.32 अंकांवर व्यवहार करत आहे.
Rakesh Jhunjhunwala:शेअर बाजारातील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62व्या वर्षी निधन
बाजारातील वाढीसह बँकिंग क्षेत्रही वेगाने प्रगती करत आहे. BSE वर लिस्टेड कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपने 344 लाख कोटींची विक्रमी पातळी ओलांडली आहे. याआधी सोमवारी बीएसई सेन्सेक्स 1383 अंकांनी उसळी घेत 68,865 वर बंद झाला आणि मंगळवारी पुन्हा एकदा वाढीसह उघडला आणि 69000 च्या पुढे गेला.
The stock market bounced today Sensex crossed the 69000 level for the first time
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची 8 वर्षे : सरकारची भलामण; विरोधकांचे शरसंधान… पण जनतेच्या मनात नेमके काय??
- UPSC : महाराष्ट्रातील 60 हून अधिक विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश!!; महाराष्ट्र कन्यांची बाजी!!
- राज्यसभा निवडणूक : कोल्हापूरचा कोणता पैलवान जास्तीत जास्त अपक्षांना खेचणार??
- भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान घायकुतीला; ट्रॅक 2 डिप्लोमसीचा करावा लागतोय वापर!!