वृत्तसंस्था
मुंबई : नबाब मलिक, समीर वानखेडे, मोहित कंबोज, अस्लम शेख, सुनील पाटील ही नावे जरी सध्या आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये गाजत असली तसेच ते दररोज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असले तरी या आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे कायदेशीर काम अजिबात थांबलेले नाही. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दिल्लीतील टीमने आर्यन खान याला चौकशी आणि तपासासाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले आहे.The Special Investigation Team (SIT) of the Narcotics Control Bureau (NCB) had summoned Aryan Khan
त्याच्याआधी अरबाज मर्चंट याला देखील समन्स पाठवले असून तो नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई कार्यालयात हजर झाला आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दिल्लीतील टीमने आर्यन खान ड्रग्ज केससह अन्य सहा केसेसची देखील चौकशी आणि तपास सुरू केला असून लवकरच या संदर्भात कायदेशीर समन्स पाठवण्यात येतील, अशी माहिती नर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सूत्रांनी दिली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असले तरी त्याचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कायदेशीर कारवाईवर काहीही परिणाम होणार नाही. कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई पुढे चालूच राहील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
The Special Investigation Team (SIT) of the Narcotics Control Bureau (NCB) had summoned Aryan Khan
महत्त्वाच्या बातम्या
- गडबड चीज पीएंगे तो ऐसाही होगा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दारूबंदी निर्णयावर ठाम
- खलिस्तानवाद्यांचा आता थेट कॅनडात जाऊन शोध, शेतकरी आंदोलनात सहभागाचा संशय
- केंद्राने केले आता तुम्हीही करा, इंधनावरील १२ रुपये नफा कमी करून सवलत द्या, नवनीत राणा यांची मागणी
- शरद पवार कधीपासून सरकारची भूमिका मांडायला लागले? चद्रकांत पाटील यांचा सवाल
- मुकेश अंबानी भारतातच राहणार, लंडनला स्थाईक होणार असल्याच्या अफवाच