• Download App
    कंत्राटी भरतीचे पाप काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचेच; कंत्राटीचा जीआर रद्द!!; फडणवीसांची घोषणा|The sin of contract recruitment belongs to Congress, Ubhata Shiv Sena and Pawar's NCP; GR OF CONTRACT CANCELED!!; Fadnavis' announcement

    कंत्राटी भरतीचे पाप काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचेच; कंत्राटीचा जीआर रद्द!!; फडणवीसांची घोषणा

    प्रतिनिधी

    मुंबई : कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर काँग्रेस उबाठा शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी यांनी युवकांची दिशाभूल केली त्याबद्दल त्यांनी अधिक माफी मागावी, अशी आक्रमक भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती जीआर रद्द केल्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. जनरल भरती कंत्राटीच होणार आहे, पण ती कोणत्या एजन्सी कडून नव्हे, तर थेट सरकारकडूनच प्रक्रिया राबविली जाणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषदेत केली.The sin of contract recruitment belongs to Congress, Ubhata Shiv Sena and Pawar’s NCP; GR OF CONTRACT CANCELED!!; Fadnavis’ announcement

    कंत्राटी भरतीचा सर्व घटनाक्रम देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर सांगितला.

    युवकांची दिशाभूल केल्याबद्दल कॉंग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही त्यांना जनतेसमोर उघडे पाडू अशा इशारा फडणवीसांनी दिला.



    महाराष्ट्रात पहिली कंत्राटी भरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्षण विभागात केली. 2010 मध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला. यामध्ये वाहन चालक, तांत्रिक, लिपिक, शिपाई पदांचा जीआर काढण्यात आला.

    1 सप्टेंबर 2021 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरएफपीला सरकारची मान्यता मिळाली. मसूदा मंजुर झाला, निविदा निघाल्या. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या सहीचा कागद दाखवत कंत्राटी भरतीला मान्यता मिळाल्याचा आरोप केला.

    त्यामुळे कंत्राटी भरतीचे हे संपूर्ण पाप कॉंग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहे. आमच्याही काळात कंत्राटी लोकं घेतली. कारण संपूर्ण प्रक्रिया बदलायला वेळ लागला. पण आता विरोधक युवकांचा कळवळा आणून आंदोलन करत आहेत. त्यांना लाज, शरम वाटली पाहिजे, असे शरसंधान फडणवीस यांनी साधले

    मुंबईत 7000 ते 10000 पोलीस कमी पडू शकतात. पोलीस सुरक्षा महामंडळ ट्रेनिंग दिलेले कॅन्डीडेट 3000 पोलिस मुंबईत वापरले जातील. त्याचा पगार मुंबई पोलिसातून केला जाणार. पण विरोधक तरूणाईत असंतोष करून अराजक परिस्थितीत करण्साचे काम केले जात आहे. 9 एजन्सी माध्यमातुन जे काम केले जाणार त्याबाबत जीआर रद्द केला जाईल, अशी घोषणा फडणवीसांनी केली. इतर विभागात जनरल कंत्राटी भरती सुरू राहील. ज्या एजन्सी माध्यातून भरती केली जाणार होती, ती फक्त रद्द केली, असे ते म्हणाले.

    मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांच्या पापाचे ओझं आपण का उचलायच??, असा प्रश्न मी त्यांना विचारला. आम्ही कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला. युवकांची दिशाभूल केल्याबद्दल कॉंग्रेस, उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माफी मागितली पाहिजे. नाहीतर आम्ही त्यांना जनतेसमोर उघडे पाडू, अशा इशारा फडणवीसांनी दिला.

    The sin of contract recruitment belongs to Congress, Ubhata Shiv Sena and Pawar’s NCP; GR OF CONTRACT CANCELED!!; Fadnavis’ announcement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य