• Download App
    केजरीवालांच्या जामीनावरचा निर्णय राऊज कोर्टाने ठेवला राखून, पण ते कवितांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला!!|The Rouse Court reserved the decision on Kejriwal's bail, but the Supreme Court rejected Kavita's bail application!!

    केजरीवालांच्या जामीनावरचा निर्णय राऊज कोर्टाने ठेवला राखून, पण ते कवितांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीतील मनी लॉन्ड्रीग केस मध्ये ईडीने अटक केलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जामीन अर्जावरचा निर्णय राऊज कोर्टाने राखून ठेवला, पण दारू घोटाळ्यात ईडीने अटक केलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. जामीन अर्ज घेऊन तुम्ही थेट सुप्रीम कोर्टात कशा येतात त्यासाठी कनिष्ठ न्यायालय आहेत ना. तिथे जा, अशा शब्दांमध्ये की कविता यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले. जामिनासाठी संबंधित कनिष्ठ न्यायालयात दाद मागा, असे निर्देश न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने दिले.The Rouse Court reserved the decision on Kejriwal’s bail, but the Supreme Court rejected Kavita’s bail application!!



    अरविंद केजरीवाल देखील सुप्रीम कोर्टात गेलेच होते पण त्यांनी वेळीच आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने कुठला ताशेरा मारला नाही, पण के. कविता मात्र या ताशेऱ्यातून सुटू शकल्या नाहीत. शिष्टाचारानुसार तुम्ही आधी संबंधित न्यायालयात दाद मागणे अपेक्षित आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

    हवाला प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमांनुसार सक्तवसुली संचलनालयाने कविता यांना अटक केली आहे. कविता यांनी या अटकेला आव्हान दिले आहे. त्याची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावत 6 आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. के. कविता यांच्यातर्फे कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

    देशात काय सुरु आहे पहा. केवळ साक्षीदाराच्या जबाबावर राजकीय विरोधकांना अटक केली जात आहे. हे अत्यंत दुर्दैवास्पद असल्याचे सिब्बल यांनी सुनावणीदरम्यान सांगितले. त्यावर ‘एक वकील म्हणून तुम्ही निराश अथवा भावनिक होऊ नका’, असा शेरा खंडपीठाने मारला.

    सर्व प्रलंबित याचिकांसोबत कविता यांची याचिका सुनावणीसाठी घेतली जाईल. कविता यांच्या जामीन अर्जाचा विचार करायचा झाला तर त्यासाठी तुम्ही संबंधित न्यायालयात दाद मागा, असेही न्यायालयाने सिब्बल यांना सांगितले. सिब्बल यांनी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच इतर काही नेत्यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला. यावर राजकीय भाष्य करू नका, असे खंडपीठाने सिब्बल यांना सुनावले.

    The Rouse Court reserved the decision on Kejriwal’s bail, but the Supreme Court rejected Kavita’s bail application!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार

    National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण

    Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला