कुत्र्यांच्या शहणपणाच्या आणि मालकाबद्दलच्या प्रेमाच्या अनेक कथा आहेत. पण कोईमतूर रमध्ये पाळीव कुत्र्याच्या शहाणपणाचा अनोखा प्रकार दिसून आला आहे. मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्या पाळीव कुत्र्याने पकडून ठेवले. त्याला पळून जाऊ दिले नाही. त्यामुळे या बलात्काऱ्या अटक करणे पोलीसांना शक्य झाले. The rapist of a mentally ill woman was caught by a pet dog
विशेष प्रतिनिधी
कोईमतूर : कुत्र्यांच्या शहाणपणाच्या आणि मालकाबद्दलच्या प्रेमाच्या अनेक कथा आहेत. पण कोईमतूर रमध्ये पाळीव कुत्र्याच्या शहाणपणाचा अनोखा प्रकार दिसून आला आहे. मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्या पाळीव कुत्र्याने पकडून ठेवले. त्याला पळून जाऊ दिले नाही. त्यामुळे या बलात्काऱ्या अटक करणे पोलीसांना शक्य झाले.
कोईमतूर मधील सेल्वापूरममध्ये एका कुटुंबात मनोरुग्ण महिला आहे. ही महिला एक शेडमध्ये राहत होती. याच कंपाऊंडमध्ये तिचे कुटुंबियही राहत होते. शुक्रवारी रात्री दीपंकर नावाचा तीस वर्षांचा तरुण या महिलेच्या शेडमध्ये घुसला. त्याने आपली दुचाकी घरापासून लांब लावली होती. त्याने मनोरुग्ण महिलेवर बलात्कार केला. या कुुटुंबियाच्या पाळीव कुत्र्याने हा प्रकार पाहिला.
त्याने पळत येऊन दीपंकर नावाच्या या तरुणाची पॅँट धरून ठेवली. त्याला पळून जाऊ दिले नाही. शेडमधील लाईट बंद झाल्याचे पाहून कुुटुंबियांना संशय आला. त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता आरोपीला कुत्र्याने पकडलेले पाहिले. त्यांनी तातडीने शेजाºयांना मदतीला बोलावले. सगळ्यांनी मिळून त्याला पकडले आणि पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीस तपासात या मनोरुग्ण महिलेवर दीपंकरने दोन वेळा बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडीओही काढला होता.
The rapist of a mentally ill woman was caught by a pet dog
महत्त्वाच्या बातम्या
- लाजिरवाणे : राज्यात भयंकर नक्षली हल्ला होऊनही मुख्यमंत्री बघेल निवडणुकीच्या प्रचारातच मश्गुल
- ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने रचला इतिहास, सलग 22 वनडे जिंकून मोडला पुरुष संघाचा विक्रम
- महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश
- यूपीतल्या गुंडांना जसे गुडघे टेकायला लावले, तसे टीएमसीच्या गुंडांनांही गुडघे टेकायला लावू; योगी आदित्यनाथांचा बंगालमध्ये इशारा
- निवडणूक आयोगाने ममतांच्या आरोपांना दिले उत्तर, नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रियेवरून केलेली तक्रार चुकीची