आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही संबंधित घटना अयोग्य असल्याचं म्हटलं. The raid on the family of Chief Minister Channy by ED, the political atmosphere in Punjab became hot
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दरम्यान पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.मात्र,त्याआधी घडणाऱ्या घटनांनी पंजाबमधील वातावरण गरम झालंय.पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या कुटुंबीयांवरच ईडीने छापे टाकले आहेत.
वाळूमाफिया भूपिंदरसिंग हनी यांच्या काही मालमत्तांची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर हा वाद उफाळून आला आहे.पंजाबमध्ये एकूण 10 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत.आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही संबंधित घटना अयोग्य असल्याचं म्हटलं.
मुख्यमंत्री चन्नी यांनी आरोप केला आहे की , माझ्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर छापा टाकला जात आहे. ते मला टार्गेट करत आहेत.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.तसेच हे लोकशाहीसाठी चांगलं नाही.आम्ही यासाठी लढण्यास तयार आहोत.पश्चिम बंगालच्या निवडणुकीतही असेच घडलं, असे ते म्हणाले.
The raid on the family of Chief Minister Channy by ED, the political atmosphere in Punjab became hot
महत्त्वाच्या बातम्या
- १९९० च्या दशकात नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द , मुंबई हायकोर्टाने दिला निर्णय
- बोकडाचा बळी देण्याऐवजी ऐवजी माणसाच्या गळ्यावर सुरी चालविली; आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना; दारूच्या नशेत कृत्य
- एसटी बसेसचे स्टेअरिंग होमगार्डच्या हाती, राज्यभरात चार हजार जवान तयार ; जवानांकडे आहे अवजड वाहन चालवण्याचा परवाना