विशेष प्रतिनिधी
लाहोर : मोटारीने जात असलेल्या तीन तरुणांची पोलीसांनी तपासणी केली. त्यांच्याकडे दारू सापडल्याने गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, त्यातील एक जण सावत्र असला तरी पंतप्रधानांचा मुलगा असल्याने लगेच चक्रे फिरली आणि त्याला सोडून द्यावे लागले.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा हा मुलगा आहे.The Prime Minister’s step-son was arrested for possession of alcohol and released immediately
इम्रान खान यांच्या सावत्र मुलासह तिघांना दारू बाळगल्याच्या आरोपावरून अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून लागलीच सोडून देण्यात आला. मुसा मनेका असे इम्रान खान यांच्या सावत्र मुलाचे नाव आहे.
इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बिबी यांचा मुसा हा मुलगा आहे. पाकिस्तानात दारू विक्री आणि प्राशन करणे बेकायदा आहे.मुसा आणि त्याचे दोन मित्र मोटारीने प्रवास करीत होते. त्या मोटारीमध्ये े दारू आढळल्याने पोलिसांनी मुसासह तिघांना गद्दाफी स्टेडियमनजीक अटक केली होती.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्याला त्याच दिवशी सोडून देण्यात आले. दारू बाळगल्यावरून अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना धमकी दिली की, मी पाकिस्तानच्या प्रथम महिलेचा मुलगा आहे.
गंभीर परिणाम होतील. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर पंजाब पोलीस प्रमुखांना वरिष्ठांचे फोन सुरू झाले. त्यामुळे पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई न करता तासाभरातच त्यांची कोठडीतून सुटका केली.
The Prime Minister’s step-son was arrested for possession of alcohol and released immediately
महत्त्वाच्या बातम्या
- तामीळनाडूमध्ये किन्नरशक्ती, तृतियपंथीयाचा निवडणुकीत विजय
- नवाब मलिकला पाठिंबा म्हणजे राष्ट्रवादीचे दाऊद टोळीचे समर्थन, रावसाहेब दानवे यांचा आरोप
- भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा विश्वास
- बिहारमध्ये दारू अड्डे शोधण्यासाठी आता हेलिकॉप्टरचा वापर