• Download App
    पंतप्रधानांनी भर सभेत कार्यकर्त्याचे धरले पाय, पाहायला मिळाले वेगळेच रुप|The Prime Minister held the legs of the Karykarta

    पंतप्रधानांनी भर सभेत कार्यकर्त्याचे धरले पाय, पाहायला मिळाले वेगळेच रुप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यकर्त्याचे पाय धरले. त्यांचे एक वेगळेच रुप पाहायला मिळाले. यामागचे कारण ऐकून संपूर्ण देश पंतप्रधानांप्रति गौरवाची भावना व्यक्त करत आहे.
    उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उन्नाव येथे आले होते.The Prime Minister held the legs of the Karykarta

    यावेळी जिल्हाध्यक्ष अवधेश कटियार यांनी मोदींना भगवान श्रीरामाची मूर्ती भेट दिली. मूर्ती दिल्यानंतर अवधेश कटियार यांनी पीएम मोदींच्या पायाला स्पर्श केला. त्यानंतर पीएम मोदींनी अवधेश कटियार यांना त्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. शिष्टाचार म्हणून पंतप्रधानांनी स्वत: अवधेशच्या पायाला स्पर्श केला. रामाची मूर्ती भेट म्हणून देणाऱ्याने पायाला स्पर्श करू नये,



    असे पंतप्रधानांच्या कृत्यामागचे कारण आहे.भाजप नेते अरुण यादव यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

    The Prime Minister held the legs of the Karykarta

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत