• Download App
    सर्वांना खुष ठेवण्याचे राजकारण केले नाही : बंगाल भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांची भावनिक पोस्ट ; राजकीय सन्यासाची चर्चा। The politics of keeping everyone happy is not done: Emotional post by Bengal BJP MP Babul Supriyo; Discussion of political asceticism

    सर्वांना खुष ठेवण्याचे राजकारण केले नाही : बंगाल भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांची भावनिक पोस्ट ; राजकीय सन्यासाची चर्चा

    वृत्तसंस्था

    कोलकाता : ‘मी सर्वाना खुष ठेवण्यासाठी कधीच राजकारण केलेले नाही.ते मला शक्य नाही आणि तसा मी प्रयत्न सुद्धा केलेला नाही. त्यामुळेच मी सर्वांसाठी चांगला बनलो नाही. ”अशी भावनिक पोस्ट पश्चिम बंगालमधील भाजपचे आसानसोलचे खासदार आणि माजी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी लिहिली आहे. त्यामुळे ते राजकीय सन्यास घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. The politics of keeping everyone happy is not done: Emotional post by Bengal BJP MP Babul Supriyo; Discussion of political asceticism



    या बाबत त्यांनी सूचक इशारा केला आहे. फेसबुकवरील पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘असे काही लोक आहेत ज्यांच्याशी मी चांगले वागलो नाही. मी त्या लोकांना फटकारले. ते पुढे लिहितात – ‘मी संधीसाधू, अविश्वसनीय आणि पाठीत खंजीर खुपसणारा नाही. याआधी त्यांनी फेसबुकवर लिहिले होते – ‘जेव्हा मी राजकारणाबाहेरील गाण्यांबद्दल पोस्ट करतो तेव्हाच मला चांगला प्रतिसाद मिळतो. अनेक पोस्टद्वारे मला राजकारणापासून दूर राहण्याची विनंती करण्यात आली आहे, ज्यामुळे या बाबी मला याविषयी सखोल विचार करायला लावत आहे.

    केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकल्यापासून बाबुल सुप्रियो राजकारणापासून दूर जात आहेत. मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर त्यांनी आपल्या दुःखाला वाट करून दिली. त्यांनी लिहिले ‘बंगालमधून मंत्रिमंडळात सामील होणाऱ्या नवीन सहकाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. मी दुःखी आहे. पण मी त्या लोकांसाठी खूप आनंदी आहे. त्यांचे निकटवर्तीय म्हणतात की त्यांना काही काळ राजकारणापासून दूर राहायचे आहे.

    The politics of keeping everyone happy is not done: Emotional post by Bengal BJP MP Babul Supriyo; Discussion of political asceticism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध