• Download App
    लोकशाहीसाठी कीड ठरलेल्या घराणेशाही, जातीयवाद व तृष्टीकरणाच्या राजकारणाला जनतेने हद्दपार केले, अमित शहा यांचे प्रतिपादन|The people banished the politics of dynasticism, casteism and nationalism, which were a pest for democracy, Amit Shaha said

    लोकशाहीसाठी कीड ठरलेल्या घराणेशाही, जातीयवाद व तृष्टीकरणाच्या राजकारणाला जनतेने हद्दपार केले, अमित शहा यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेशच्या जनतेने लोकशाहीसाठी कीड ठरलेल्या घराणेशाही, जातीयवाद व तुष्टीकरणाच्या राजकारणाला हद्दपार केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात योगींनी सुरु केलेल्या विकास यात्रेला आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.The people banished the politics of dynasticism, casteism and nationalism, which were a pest for democracy, Amit Shaha said

    उत्तर प्रदेशात दैदीप्यमान विजय मिळविल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे अमित शहा यांच्यासह योगींनी राजभवनात जाऊन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे 272 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र व नव्या मंत्र्यांची यादी सुपूर्द केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देवही उपस्थित होते.



    लखनौच्या लोकभवनात आयोजित भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. शाहजहानपूर मतदार संघातून सलग 9 व्यांदा निवडून आलेल्या आमदार सुरेश खन्ना यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला बेबी राणी मौर्य, सूर्यप्रताप शाही, नंद गोपाल गुप्ता नंदीसह 5 आमदारांनी अनुमोदन दिले. सध्या उप मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या नावाविषयीचा सस्पेंस कायम आहे.

    उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या पूर्वी समाजवादी पक्षाने आव्हान उभे केल्याचे वातावरण तयार केले होते. मात्र, उत्तर प्रदेशातील जनतेने समाजवादी पक्षाच्या घराणेशाही आणि तृष्टीकरणाच्या राजकारणाला नाकारले. भाजपला मोठ्या मताधिक्यानेविजयी केले.

    The people banished the politics of dynasticism, casteism and nationalism, which were a pest for democracy, Amit Shaha said

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण