विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशावरील १९९१ च्या आर्थिक संकटापेक्षाही पुढील रस्ता आणखी कठीण आहे, अशी भीती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली आहे. ही आनंद करण्याची नव्हे तर चिंतन करून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची वेळ आहे. प्रत्येक भारतीयाला निरोगी आणि सन्माननीय जीवन बहाल करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.The path ahead is even more difficult than the 1991 crisis in the country, said former Prime Minister Dr. Manmohan Singh
आर्थिक उदारीकरणाची ३० वर्षे या विषयावर बोलताना डॉ. मनमोहन सिंह म्हणाले की १९९१ च्या आर्थिक सुधारणांनी कोट्यवधी लोकांना गरीबीतून मुक्त केले. मुक्त उद्योगांना वाव दिला. भारताला तीन ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविले. परंतु, आताचे संकट जास्त भयावह आहे.
कोरोना ममहामारीमुळे झालेल्या विध्वंसबद्दल आपली व्यथा व्यक्त केली. अनेकांनी आपले चांगले जीवनमान गमावले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, स्गेल्या तीन दशकांत आपल्या देशाने केलेल्या जबरदस्त आर्थिक प्रगतीबद्दल अभिमानाने परत पाहताना आम्हाला खूप आनंद होतो.
पण कोरोनाच्या महामारीमुळे झालेल्या दुर्घटना आणि कोट्यवधी भारतीयांचे झालेले नुकसान पाहून मला अतीव दु:ख होत आहे. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन हरविले आहे. कित्येकांचे मृत्यू झाले आहेत.
दिवंगत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे अर्थमंत्री म्हणून काम केलेल्या डॉ. मनमोहन सिंह यांनी आर्थिक सुधारणांच्या विविध टप्यांची माहिती दिली. मुक्त अर्थव्यवस्था सुरू झाल्यापासून भारताने केलेल्या प्रगतीविषयी चर्चा केली. ते म्हणाले, गेल्या तीन दशकांतील सरकारांनी आपल्या देशाला 3 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेपर्यंत आणि जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या लीगमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
सुमारे तीस कोटी भारतीयांना दारिद्रयातून बाहेर काढले आहे. त्याचबरोबर कोट्यवधी तरुणांना नवे रोजगार मिळवून दिले आहेत. उदारीकरणास आर्थिक संकटामुळे चालना मिळाली असली तरी समृद्धीची इच्छा, आपल्या क्षमतेवर विश्वास आणि सरकारने अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सोडण्याचा आत्मविश्वास यामुळे हे घडले आहे.
उदारीकरण प्रक्रियेमुळे काही भारतीय कंपन्या जागतिक स्तरावरील कंपन्या बनल्या आहेत. अनेक क्षेत्रांत जागतिक शक्ती म्हणून भारत उदयास आला आहे.कॉँग्रेस पक्षातील माझ्या अनेक सहकाºयांसोबत आर्थिक सुधारणांच्या प्रक्रियेत भूमिका निभावण्याची संधी मला मिळाली याबाबत कृतज्ञता व्यक्त करून डॉ. मनमोहन सिंह यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पीय भाषणाची आठवणही सांगितले.
ते म्हणाले, अर्थमंत्री म्हणून माझ्या अर्थसंकल्पीय भाषणाचा शेवट मी व्हिक्टर ह्यूगोचे एक वचन उद्धृत करून केले होते. पृथ्वीवरील कोणतीही शक्ती कोणाची वेळ आली की त्याच्या कल्पनेची भरारी थांबवू शकत नाही. आज तीस वर्षांनंतर एक राष्ट्र म्हणून आम्हाला रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आठवते. झोपण्यापूर्वी मला माझे वचन पूर्ण करायचे आणि आणि कित्येक मैल पुढे जायचे आहे.
The path ahead is even more difficult than the 1991 crisis in the country, said former Prime Minister Dr. Manmohan Singh
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Floods : राज्यातील गंभीर पूर संकटावर राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन, तातडीने मदत पोहोचवा
- महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष, NDRFची 26 पथके, 4 हेलिकॉप्टर्स, लष्करही दाखल; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृह राज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
- Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न साम्राज्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन? १२१ व्हिडिओंसाठी १२ लाख डॉलर्सचा रेट, मुंबई पोलिसांची माहिती
- Maharashtra Landslide : राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे