• Download App
    ऑक्सिजन संकटाशी असे झुंजले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, सात दिवस झोपलेच नाहीत, टॅँकरचालकांशी स्वत: बोलायचे|the oxygen crisis, Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan has not slept for seven days, he used to talk to the tanker drivers himself.

    ऑक्सिजन संकटाशी असे झुंजले : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, सात दिवस झोपलेच नाहीत, टॅँकरचालकांशी स्वत: बोलायचे

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी कशी झुंज दिली याचे अनुभव सांगितले आहे. त्या कठीण काळात मुख्यमंत्री सात दिवस झोपलेच नव्हते. ऑ क्सिजन घेऊन येणाऱ्या टॅँकरचालकांशी ते स्वत: बोलत असत.the oxygen crisis, Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan has not slept for seven days, he used to talk to the tanker drivers himself.

    शिवराजसिंह चौहान म्हणाले, मला हे सांगायला आता काहीही वाटत नाही की राज्यात जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता, तेव्हा मी ७ दिवस क्षणभर देखील झोपू शकलो नाही. माझ्याकडे माहिती यायची की अमुक एका हॉस्पिटलमध्ये पुढच्या ३० मिनिटांमध्ये ऑक्सिजन संपणार आहे.



    मग आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचो. मी स्वत: ऑक्सिजन टँकरच्या चालकांशी फोनवर बोलायचो. ते नेमके कुठपर्यंत पोहोचलेत, किती वेळ लागेल वगैरे माहिती घ्यायचो.

    मुख्यमंत्री म्हणाले, लोकांना हे समजायला हवं की करोनाचं संकट अद्याप ओसरलेलं नाही. आजच्या घडीला राज्यात रोज तब्बल ८० हजार चाचण्या केल्या जात आहेत. जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता,

    तेव्हा राज्य सरकारने आरोग्य सुविधा आणि लस तुटवडा देखील सुधारण्यासाठी प्रयत्न केले. अधिकारी वर्गाने देखील महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि महाराष्ट्रात जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवायला हवी. तुलनेने महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळत आहेत.

    the oxygen crisis, Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan has not slept for seven days, he used to talk to the tanker drivers himself.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    New Income Tax : नवीन आयकर नियमांचा मसुदा जारी; नियमांची संख्या 511 वरून 333 पर्यंत कमी झाली; 1 एप्रिलपासून नवीन प्रणाली लागू

    PM Modi : मोदी म्हणाले- दहशतवादाशी कोणतीही तडजोड नाही; तमिळ भाषा भारत – मलेशियाला जोडते

    Dalai Lama : दलाई लामा कार्यालयाने एपस्टीन फाइल्सशी संबंध नाकारला; सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांवर खुलासा