विशेष प्रतिनिधी
भोपाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी कशी झुंज दिली याचे अनुभव सांगितले आहे. त्या कठीण काळात मुख्यमंत्री सात दिवस झोपलेच नव्हते. ऑ क्सिजन घेऊन येणाऱ्या टॅँकरचालकांशी ते स्वत: बोलत असत.the oxygen crisis, Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan has not slept for seven days, he used to talk to the tanker drivers himself.
शिवराजसिंह चौहान म्हणाले, मला हे सांगायला आता काहीही वाटत नाही की राज्यात जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता, तेव्हा मी ७ दिवस क्षणभर देखील झोपू शकलो नाही. माझ्याकडे माहिती यायची की अमुक एका हॉस्पिटलमध्ये पुढच्या ३० मिनिटांमध्ये ऑक्सिजन संपणार आहे.
मग आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायचो. मी स्वत: ऑक्सिजन टँकरच्या चालकांशी फोनवर बोलायचो. ते नेमके कुठपर्यंत पोहोचलेत, किती वेळ लागेल वगैरे माहिती घ्यायचो.
मुख्यमंत्री म्हणाले, लोकांना हे समजायला हवं की करोनाचं संकट अद्याप ओसरलेलं नाही. आजच्या घडीला राज्यात रोज तब्बल ८० हजार चाचण्या केल्या जात आहेत. जेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता,
तेव्हा राज्य सरकारने आरोग्य सुविधा आणि लस तुटवडा देखील सुधारण्यासाठी प्रयत्न केले. अधिकारी वर्गाने देखील महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि महाराष्ट्रात जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवायला हवी. तुलनेने महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळत आहेत.
the oxygen crisis, Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan has not slept for seven days, he used to talk to the tanker drivers himself.
महत्त्वाच्या बातम्या
- देशातील सर्व डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भारतरत्न द्या, अरविंद केजरीवाल यांची मागणी
- ठाकरे सरकारची जाहिराबाजी, कोरोनाच्या संकटात आर्थिक तंगी असतानाही प्रसिध्दीवर उधळले १५५ कोटी रुपये
- वा चित्राताई! पक्षभेद विसरून महिला नेत्याच्या पाठीमागे राहिल्या उभ्या, राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांंना दिला दिलासा
- Mango diplomacy failed : आंब्याची फोड लागली गोड, आणीक तोड बाई आणीक तोड…!!
- अधीर रंजन चौधरी यांचा बळी देऊन कॉँग्रेस साधणार ममतांशी सलगी, लोकसभा नेतेपदावरून हटविणार