विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनने नवे गाव वसविल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. मात्र, हे गाव भारतीय हद्दीत नव्हे तर चीनच्या हद्दीत असल्याचे स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिले आहे.The new village set up by China near the Arunachal border is not on the Indian border, the Indian Army explained
भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी द्वीपक्षीय चचेर्ची तयारी सुरू असतानाच अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चीनने नवे गाव वसविल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. उपग्रहाने घेतलेल्या छायाचित्रांमधून ही माहिती उघड झालचा दावा करण्यात आला होता. मात्र, हे गाव चीनच्या हद्दीत असल्याचे स्पष्टीकरण भारतीय लष्कराने दिले आहे.
उपग्रहाच्या छायाचित्रांनुसार, चीनने अरुणाचल प्रदेशच्या शि-योमी जिल्ह्यात एक एन्क्लेव्ह बांधले आहे. याची उभारणी गेल्या मार्च २०१९ ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत झाली आहे. सुमारे ६० घरे असलेले हे गाव भारतीय भूमीत सहा किलोमीटर आत आणि प्रत्यक्ष ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेदरम्यान असलेल्या भागात आहे.
भारतीय लष्कराने मात्र हे गाव चीनच्या हद्दीत असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या उत्तरेकडे चीनच्या बाजूने बांधकाम झाले आहे. ताबा रेषेच्या अलीकडे भारतीय भूमीवर असे बांधकाम झालेले नाही, असे लष्कराने म्हटले आहे.
मॅक्सर टेक्नॉलॉजीज् आणि प्लॅनेट लॅब या सॅटेलाईट छायाचित्रे पुरविणाऱ्या कंपनीने ही छायाचित्रे जारी केली आहेत. त्यात अनेक इमारती दिसत असून, एका इमारतीच्या छतावर चीनचा ध्वजही रंगविलेला दृष्टीस पडतो.
नव्या एन्क्लेव्हचे अचूक स्थान भारतमॅप्स या केंद्र सरकारच्या ¸नलाईन नकाशा देणाºया संस्थेने स्पष्टपणे दाखविले आहे. नवे गाव भारतीय हद्दीत असल्याची पुष्टी या नकाशातून होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या भागाला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी काही आठवड्यांपूर्वीच भेट दिली होती.
The new village set up by China near the Arunachal border is not on the Indian border, the Indian Army explained
महत्त्वाच्या बातम्या
- परदेशी माध्यमांची कोल्हेकुई, कृषि कायदे रद्द करणे म्हणजे मोदी नरमले
- राजस्थानचे कॉँग्रेस सरकार पुन्हा अडचणीत, तीन मंत्र्यांनी थेट सोनिया गांधींना पत्र लिहून केली राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त
- कृषि कायदे मागे घेतल्याने कृषि सुधारणांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे सदस्य अनिल घनवट यांची टीका
- कॅ. अमरिंदर सिंग भाजपासोबत लढविणार निवडणूक, कृषि कायद्याचा विषय नसल्याने अकाली दलही सोबत येणार