विशेष प्रतिनिधी
लखीमपूर खीरी : लखीमपूर खीरी हिंसाचारातील धक्कादायक खुलासा समोर आला आहे. जखमी पोलिसांच्या समोरच शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या गाड्यांच्या ताफ्यात काँग्रेसचे माजी खासदार अखिलेश दास यांचा पुतण्या होता असे समोर आले आहे.The nephew of a former Congress MP in a convoy of vehicles crushing farmers
या ताफ्यामध्ये अंकित दास आपल्या फॉर्च्युनर गाडीत होता. लखनऊच्या हुसैनगंजमध्ये राहणाºया या जखमी तरुणाने सांगितले की तो त्या दासच्या गाडीत बसला होता. तो तरुण पाच जणांसोबत लखीमपूरच्या कार्यक्रमासाठी आला होता. त्याच्या पुढील थार जीप लोकांना उडवत पुढे जात होती.
अंकित दासची काळी फॉर्च्युनर त्या थारच्या मागे चालली होती. याचवेळी बाहेर असलेल्या आंदोलकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या थार जीपमध्ये कोण कोण होते याची माहिती देण्यास मात्र त्या तरुणाने नकार दिला.
थार जीपचा चालक आणि त्याच्या शेजारी पुढील सीटवर बसलेला शुभम मिश्रा नावाच्या भाजपा नेत्याची आंदोलक शेतकऱ्यांच्या जमावाने हत्या केली. आणखी एक नेता सुमित जयस्वाल याने तेथून पलायन करत जीव वाचविला. याचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. यामध्ये सुमित जीपचा दरवाजा खोलून बाहेर पळताना दिसत आहे.
त्याच्या म्हणण्यानुसार जर तो तेथून पळाला नसता तर तो वाचला नसता. लखीमपुर हिंसाचार प्रकरणी चार शेतकऱ्यांसह आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. युपी सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
तसेच सरकारी नोकरी देखील देण्याचे कबुल करण्यात आले आहे. दुसरीकडे पोलिसांनी केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
The nephew of a former Congress MP in a convoy of vehicles crushing farmers
महत्त्वाच्या बातम्या
- टाटा ग्रुपमध्ये नोकरीची संधी, विविध कंपन्यांमध्ये ४५६४ रिक्त जागा लवकरच भरणार
- नारायण राणे यांनी सिध्द केले कोकणवरील वर्चस्व, वेंगुर्ला उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना आघाडीला दणका
- सरकारवर टीका करणे खूप सोपे असते पण…गेल्या शंभर वर्षांपासूनच्या आरोग्यसेवेसाठी सध्याच्या राज्यकर्त्यांना दोषी ठरविणे चुकीचे, सर्वोच्च न्यायालयाकडून ऑक्सिजन कमतरतेवर तपासाचे आदेश देण्यास नकार
- श्रीनगर मध्ये दहशतवादी हल्ला, 3 नागरिकांची हत्या