• Download App
    काश्मीर खोऱ्यात दररोज सकाळी घुमणार राष्ट्रगीताचे सूर, सरकारने शाळांना जारी केले परिपत्रक|The National Anthem will play every morning in the Kashmir valley, the government has issued a circular to schools

    काश्मीर खोऱ्यात दररोज सकाळी घुमणार राष्ट्रगीताचे सूर, सरकारने शाळांना जारी केले परिपत्रक

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : आता जन-गण-मनचे सूर जम्मू-काश्मीच्या प्रत्येक शाळेत रोज सकाळी ऐकू येईल. सकाळच्या प्रार्थना सभेत राष्ट्रगीत गायलेच पाहिजे, अशा सूचना राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिल्या आहेत. शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना सूचना पाठवल्या आहेत. या परिपत्रकात म्हटले आहे की, सकाळच्या प्रार्थना सभेत राष्ट्रगीत गाण्याने विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची आणि शिस्तीची भावना निर्माण होते. मात्र, केंद्रशासित प्रदेशातील अनेक शाळांमध्ये याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.The National Anthem will play every morning in the Kashmir valley, the government has issued a circular to schools



    मुलांमध्ये पर्यावरण आणि अंमली पदार्थांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी काही अतिथी वक्त्यांनाही बोलावण्यात यावे, असेही या परिपत्रकात सुचवण्यात आले आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, सकाळचा परिपाठ मुलांसाठी नैतिक समज आणि मानसिक शांतीचे व्यासपीठ आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत राष्ट्रगीत समाविष्ट करणे बंधनकारक आहे.

    जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. खोऱ्यातील दहशतवादाची समस्या अद्याप पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NSA आणि इतर अधिकाऱ्यांसोबत जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींनी खोऱ्यात दहशतवादविरोधी कारवाया तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनीही पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा केली.

    गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. गेल्या 72 तासांत चार दहशतवादी हल्ले झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या डीजीपीने सांगितले होते की, पाकिस्तानातून सुमारे 70 दहशतवादी एलओसीवरून घुसले आहेत. रियासी येथे दहशतवाद्यांनी भाविकांच्या बसला लक्ष्य केले होते. यात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत. यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला.

    यानंतर दहशतवाद्यांनी कठुआ आणि डोडा जिल्ह्यात चार ठिकाणी हल्ले केले. यामध्ये सीआरपीएफचा एक जवानही शहीद झाला. याशिवाय सात सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. अधिका-यांनी राजौरी आणि जम्मूच्या लोकांना त्यांची वाहने सुरू करण्यापूर्वी त्यांची योग्य प्रकारे तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यातून बॉम्बस्फोटासारखी घटना घडवण्याचा कट दहशतवाद्यांचा आहे.

    The National Anthem will play every morning in the Kashmir valley, the government has issued a circular to schools

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले