• Download App
    मुस्लिम महिलांचे लग्नाचे वय वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशभरात प्रचार करणार|The Muslim National Forum will campaign across the country to increase the age of marriage for Muslim women

    मुस्लिम महिलांचे लग्नाचे वय वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशभरात प्रचार करणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील मुस्लिम समाजात तिहेरी तलाक,एक पेक्षा जास्त विवाह पध्दती, हिजाब, मुलींचे लग्नाचे विवाह विवाह याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.आता आरएसएसच्या जवळच्या समजल्या जाणाºया मुस्लिम राष्ट्रीय मंचने मुस्लिम महिलांसाठी पुढाकार घेतलाय. मुस्लिम महिलांचे लग्नाचे वय वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशभरात प्रचार करणार आहे.The Muslim National Forum will campaign across the country to increase the age of marriage for Muslim women

    मुस्लिम महिलांच्या लग्नाच्या वयांवरुन अनेक प्रश्नचिन्ह होते. आता यावर मुस्लिम राष्ट्रीय मंच मुस्लिम महिलांचे विवाहाचे वय वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशव्यापी मोहीम राबवणार आहे. जेणेकरून या विषयाला जनआंदोलन करता येईल.



    आरएसएसच्या जवळच्या समजल्या जाणाºया मुस्लिम राष्ट्रीय मंच या मोहिमेअंतर्गत मशिदीमध्ये महिलांना नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र जागा बनवण्याच्या मागणीसाठी जनसमर्थन मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.

    मंचाने म्हटले आहे की, देशातील मुस्लिम समाज तिहेरी तलाक, एक पेक्षा जास्त विवाह पध्दती, हिजाब, मुलींचे लग्नाचे वय इतर अनेक बाबींबाबत जागरूक झाला आहे. या मंचाने या सर्व प्रकरणांवर देशव्यापी चर्चा करण्याचे आवाहन केले.

    मंचाने म्हटले आहे की, सुशिक्षित आणि प्रगतीशील कुटुंबांव्यतिरिक्त, मुस्लिम मुलींचा लहान वयातच विवाह करतात, मुस्लिम राष्ट्रीय मंचनी दावा केला की,ग्रामीण भागातील अनेक मुलींचे वय 12-13 वर्षे असताना विवाह केले जातो आणि 20 वर्षे वयापर्यंत त्यांना अनेक मुले होतात.हे चुकीचे आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांचे विवाहाचे वय वाढवण्यासाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच देशव्यापी मोहीम राबवणार आहे.

    The Muslim National Forum will campaign across the country to increase the age of marriage for Muslim women

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार