• Download App
    मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मशिदीतील लाऊडस्पीकर बंद करणार, मुस्लिम समाजाने घेतला निर्णय|The Muslim community has decided to turn off loudspeakers in the mosque so as not to disrupt children's studies

    मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मशिदीतील लाऊडस्पीकर बंद करणार, मुस्लिम समाजाने घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    जलपायगुडी : मुलांच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मुस्लिम समाजाने मशिदीतील लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील एका मशिदीचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.The Muslim community has decided to turn off loudspeakers in the mosque so as not to disrupt children’s studies

    मुलांना शिक्षण घेताना अजानमुळे कोणताही त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे. शिवाय, मशिदीने मुलांच्या शिक्षणासाठी जागा देखील दिली आहे. मुस्लिम समाजातील लोकांच्या या कामाचे सर्वजण कौतुक करत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी हा खूप स्तुत्य निर्णय असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.


     


     

    मशीद प्रशासनाने आम्हाला चांगले सहकार्य केल्याचे मशिदीजवळील शाळेचे शिक्षक इंद्रनील साहा यांनी सांगितले. करोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मशिदीमध्ये अजान आणि नमाजसाठी लाऊडस्पीकर न वापरण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे साहा म्हणाले.

    लाऊडस्पीकरवर अजानच्या आणि नमाजच्या आवाजामुळे त्रास होत असल्याची तक्रार आत्तापर्यंत अनेकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील एका मशिदीच्या इमामाने लाऊडस्पीकरवर नमाज पठण करण्याबाबत एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

    The Muslim community has decided to turn off loudspeakers in the mosque so as not to disrupt children’s studies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Suvendu Adhikari : सुवेंदूंची घोषणा- ममता सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार; महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी एचसीचे न्यायाधीश करतील

    Russian Crude Oil : भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील; सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही

    पश्चिम बंगाल प्रमाणेच उत्तर प्रदेशात काँग्रेस लागली कामाला; भाजपची सत्ता आणायला!!