नाशिक : मोदी सरकारने बरोबर नस दाबली; FCRA कायद्यातही दुरुस्ती धर्मांतराचे उद्योग करणाऱ्या चर्चला खटकली!!, ही वस्तुस्थिती एका वक्तव्यातून समोर आली.
केरळच्या कोट्टायम मधून FCRA च्या नवीन नियमांबाबत मलंकारा ऑर्थोडॉक्स चर्चचे बिशप युहानोन मार डायस्कोरोस यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. ते म्हणाले, “… FCRA च्या नवीन नियमाबाबत चर्चने आपली भूमिका मांडली आहे. हे धोरण चर्चच्या सर्व खात्यांशी संबंधित आहे. चर्च ही एक धर्मप्रांत (डायोसिस) असून त्यात स्वतंत्र पॅरिश (स्थानिक चर्च समुदाय) आणि त्यांच्या संस्था आणि सर्व धर्मादाय संस्थांचा समावेश होतो.
प्रत्येक घटक आपली खाती व्यवस्थित सांभाळतो आणि संबंधित प्राधिकरणांकडे त्यांचे तपशील योग्यरित्या सादर करतो; अशीच सध्याची कार्यपद्धती आहे. परंतु, सध्याचा FCRA नियम चर्च आणि समाजाच्या कामकाजात हस्तक्षेप करणारा आहे. हे देशाच्या लोकशाही स्वरूपाच्या विरोधात आहे, असे चर्चला वाटते. त्यामुळे, सध्या काय घडत आहे आणि या गोष्टींचे परिणाम काय होतील, हे भारत सरकारने नीट समजून घेणे गरजेचे आहे. चर्च आणि समाजात मोठ्या प्रमाणावर धर्मादाय कार्य करणाऱ्या इतर संस्थांना त्यांचे कामकाज सुरळीतपणे चालवता यावे, यासाठी आम्ही सरकारला हा नवीन FCRA नियम बदलण्याची विनंती करतो.”
– धर्मांतराला प्रोत्साहनाचे पाप
बिशप युहानोन मार डायस्कोरोस यांची भाषा वरवर जरी राज्यघटनेतल्या चौकटीतली आणि सरकारला विनंती करणारी वाटत असली तरी प्रत्यक्षात त्यांनी चर्चला सरकारच्या कायदेशीर चौकटीतून बाहेर काढण्याचाच युक्तिवाद केलेला दिसला. तर धर्मादाय कार्य करते आणि त्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप होतो हे चर्चला नकोय असे त्यांचे मत दिसले, पण प्रत्यक्षात चर्च धर्मादाय या शब्दाच्या नावाखाली धर्मांतराचे प्रकार घडवून आणते किंवा प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे धर्मांतराला प्रोत्साहन देते, याबद्दल बिशप युहानोन मार डायस्कोरोस यांनी चकार शब्द काढला नाही. उलट त्यांनी धर्मादाय या शब्दाच्या आवरणाखाली धर्मांतराचे पाप झाकले.
– FCRA काय घेतले दुरुस्तीला विरोध का??
प्रत्यक्षात केंद्रातल्या मोदी सरकारने FCRA कायद्यानुसार चर्च कडे नुसता हिशेब मागितला नाही, तर त्याचे तपशील मागितले परदेशातून आलेला मदतीच्या नावाखाली पैसा नेमका कुठे आणि कसा वापरला जातो याची अधिकृत माहिती चर्च कडून मागविली, त्यासाठी FCRA नियमावलीत दुरुस्ती केली म्हणूनच ती बिशप युहानोन यांना खटकली आणि त्यांनी अतिशय गोड गुलाबी भाषेत आणि घटनात्मक चौकटीत राहून तीव्र नापसंती व्यक्त केली. पण यातून त्यांचा मूळ हेतू लपून राहिला नाही.
The Modi government hit the right nerve; the amendment to the FCRA law irked churches engaged in conversion activities.
महत्वाच्या बातम्या
- पद्मसिंह पाटलांच्या सत्काराची अफवा; राणा जगजीत सिंहांचे स्पष्टीकरण काय??
- श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा नाशिकच्या रामतीर्थ निरंजन मठात २७ जूनला पट्टाभिषेक सोहळा!!
- Telegram : टेलीग्राम 7 दिवसांनी सुरू, प्ले स्टोअरवर परत आले; NEET परीक्षेत गडबडीनंतर बंदी होती
- सगळीकडून फटके मिळाल्यानंतर राहुल नार्वेकर सुधारले; विधानसभेत दिलगिरी व्यक्त करते झाले!!