जागतिक रेल्वेच्या इतिहासातील चमत्कार मानल्य जाणाऱ्या चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाचा महत्वाचा भाग असलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या कमानीचे काम सोमवारी पूर्ण होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जागतिक रेल्वेच्या इतिहासातील चमत्कार मानल्य जाणाऱ्या चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाचा महत्वाचा भाग असलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या कमानीचे काम सोमवारी पूर्ण होणार आहे. The miracle of Indian Railways, the world’s largest bridge arch will be completed on Monday
रेल्वे अभियांत्रिकीमधील हे सर्वात मोठे आव्हान अभियंत्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. सोमवारी दुपारी या कमानीवरील ५.३ मीटर उंचीचा तुकडा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे कमानीचे दोन्ही भाग जोडले जातील आणि भारतीय रेल्वेचा विक्रम जगासमोर येईल. चिनाब नदीच्या दोन्ही काठांना या कमनीमुळे ३५९ मीटर उंचीवरून जोडण्यात येईल.
कटरा ते बनिहाल या १११ किलोमीटर मार्गावरील सर्वात अवघड टप्पा चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पूल होता. त्यासाठी १४०० कोटी रुपये खर्च आला आहे.
केवळ चिनाब नदीचे दोन काठच नव्हे तर या पुलाच्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारी रेल्वेने थेट जोडले जाणार आहेत. कन्याकुमारीहून निघालेली रेल्वे थेट काश्मीरला कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचणार आहे.
सध्या काश्मीरला जोडणारा उधमपूर ते कटरा हा २५ किलोमीटरचा मार्ग, बनिहाल ते क्वाझीगुंड हा १८ किलोमीटरचा मार्ग आणि क्वाझरीगुंड ते काश्मीर हा ११८ किलोमीटरचा मार्ग तयार आहे आणि गेल्या वर्षभरापासून वापरात आहे. त्यामध्ये कटरा ते बनिहाल हा मार्गच अडथळा होता. मात्र, आता चिनाब नदीवर झालेल्या पुलामुळे हा मार्गही जोडला गेला आहे.
चिनाब नदीवर हा पूल उभारण्यासाठी ९०० मीटरची कमान उभारण्यात आली आहे. जगातील ही सर्वात उंच कमान आहे.
उधमपूर -श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गाचे मुख्य अभियंता विजय शर्मा म्हणाले, इतक्या उंचीवर काम करताना प्रचंड वेगाने वाहणारे वारे सर्वात मोठा अडथळा होता. वादळामुळे आम्हाला अनेक वेळा काम थांबवावे लागले. वादळ शांत झाल्यावरच काम करणे शक्य होत होते. ताशी ५० ते ६० किलेमीटर वेगाने वारे वाहायला लागले की काम थांबवावे लागायचे. येथे हे नेहमीचेच असल्याने कमानीचे काम पूण होण्यासाठी अडीच वर्षे लागले.
हिमालयातील विशिष्ट वातावरणात हा पूल उभारणे हे मोठे आव्हान होते. जगात कोठेही असा प्रयत्न झालेला नाही. त्यामुळे भारतीय अभियंत्यांचे काम म्हणजे चमत्कारच आहे.
The miracle of Indian Railways, the world’s largest bridge arch will be completed on Monday
महत्त्वाच्या बातम्या
- लाजिरवाणे : राज्यात भयंकर नक्षली हल्ला होऊनही मुख्यमंत्री बघेल निवडणुकीच्या प्रचारातच मश्गुल
- ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने रचला इतिहास, सलग 22 वनडे जिंकून मोडला पुरुष संघाचा विक्रम
- महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश
- यूपीतल्या गुंडांना जसे गुडघे टेकायला लावले, तसे टीएमसीच्या गुंडांनांही गुडघे टेकायला लावू; योगी आदित्यनाथांचा बंगालमध्ये इशारा
- निवडणूक आयोगाने ममतांच्या आरोपांना दिले उत्तर, नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रियेवरून केलेली तक्रार चुकीची